Stocks To Buy:- सध्या शेअर बाजारातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते व त्यामुळे गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे कधीही हिताचे ठरते. सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. परंतु काही प्रसिद्ध ब्रोकरेज कंपन्यांच्या माध्यमातून काही शेअर्स खरेदी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. जी गुंतवणूकदारांसाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते. चला तर मग या लेखात आपण या महत्त्वाच्या शेअर्सची यादी बघू.
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने सुचवलेली शेअरची यादी
1- कोफोर्ज- प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरसाठी बाय रेटिंग दिले असून याकरिता 2240 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली आहे. सध्या या शेअरची किंमत 1738 रुपये आहे व यामध्ये 28% वाढ होऊ शकते. ही एक जागतिक स्तरावरची माहिती तंत्रज्ञान सेवा आणि कन्सल्टिंग कंपनी आहे.

2- अदानी पोर्ट्स- अदानी पोर्ट करिता प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी बाय रेटिंग दिली असून 1700 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या हा शेअर 1315 रुपयांवर ट्रेड करत असून यामध्ये 29 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
3- अपोलो हॉस्पिटल- प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने बाय रेटिंग कॉल कायम ठेवला असून याकरिता 8788 रुपयांची टार्गेट प्राईस ठेवली आहे. सध्या या शेअरचा भाव 7791 रुपये असून या किमतीपेक्षा टार्गेट प्राईस 12% अधिक आहे. अपोलो हॉस्पिटल ही आशिया खंडातील एक मोठी आणि प्रसिद्ध आरोग्य सेवा प्रदाता आहे.
4- जिंदाल स्टील अँड पॉवर- जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड करिता जेएम फायनान्शिअल या ब्रोकरेज फर्मने बाय रेटिंग दिले असून याकरिता 1220 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केलेली आहे. सध्या या शेअरची किंमत 973 रुपये असून ठेवलेले टार्गेट प्राईस या किमतीपेक्षा 25% जास्त आहे.