पैशांची चिंता सोडा! एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि आयुष्यभर मिळवा 100000 रुपये पेन्शन

Published on -

LIC New Scheme : अनेकांना म्हातारपणात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. यामुळे वृद्धावस्थेत पैशांची तंगी भासू नये यासाठी अनेकजण वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पैशांची तंगी भासू नये यासाठी पेन्शन योजनेचा पर्याय बेस्ट ऑप्शन ठरतो. दरम्यान तुम्ही पण अशाच एखाद्या खात्रीशीर पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एलआयसीची न्यू जीवन शांती ही योजना फायद्याची ठरणार आहे. सध्या अनेकजण या योजनेत गुंतवणूक करताना दिसतात. अशा स्थितीत आज आपण एलआयसीच्या या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कशी आहे LIC ची पेन्शन योजना ?

एलआयसी कडून सुरू करण्यात आलेली न्यू जीवन शांती योजनेबाबत बोलायचं झालं तर ही एक सिंगल प्रीमियम डिफर्ड अॅन्युइटी योजना आहे. अर्थात यामध्ये गुंतवणूकदारांना एकदा पैसा गुंतवावा लागतो आणि त्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेचे मोठी विशेषता म्हणजे भविष्यात किती पेन्शन मिळेल हे आधीच समजते. यामध्ये कमीत कमी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते आणि जास्तीच्या गुंतवणुकीसाठी एलआयसी ने कोणतीच मर्यादा सेट केलेली नाही म्हणजेच गुंतवणूकदाराला जेवढे पैसे हवेत तेवढे तो या योजनेत लावू शकतो.

इथे तुम्ही जेवढे जास्त पैसे गुंतवाल तेवढेच तुम्हाला अधिक पेन्शन मिळणार आहे. या योजनेत गुंतवणुकीचे दोन पर्याय आहेत. सिंगल लाईफ हा एक पर्याय आहे ज्या अंतर्गत एका व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळते. तसेच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला की जमा केलेली मूळ रक्कम वारसाला दिली जाते. या योजनेचा गुंतवणुकीचा दुसरा पर्याय म्हणजे जॉईंट लाइफ. यात पती-पत्नी दोघे मिळून पॉलिसी घेतात. या जॉईंट लाइफ पर्यायाअंतर्गत एकाचा मृत्यू झाला की दुसऱ्याला पेन्शन मिळत राहते.

दरम्यान दोघांचा मृत्यू झाला की रक्कम वारसदाराला दिली जाते. पण या योजनेसाठी पाच वर्षांचा लॉक इन पिरेड असतो म्हणजेच रक्कम गुंतवल्यानंतर पाच वर्ष पैसे मिळत नाहीत. पाच वर्षे पूर्ण झालेत की मग पेन्शन सुरू होते. पेन्शन योजनेसाठी 30 ते 79 वर्ष वयोगटातील नागरिक पात्र आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गरज भासल्यास पॉलिसी धारकाला कधी पण पॉलिसी सरेंडर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

कशी मिळणार एक लाख रुपयाची पेन्शन

एलआयसीच्या या योजनेत एक रकमी 11 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षांनी वार्षिक एक लाख 1 हजार 880 रुपये पेन्शन मिळते. म्हणजेच दर महिन्याला 8149 रुपये पेन्शन मिळते. गुंतवणूकदारांना पेन्शन महिन्याला हवी असेल तर महिन्याला मिळवता येते किंवा मग त्रेमासिक, सहामाही आणि वार्षिक पेन्शन मिळवण्याचा पण विकल्प गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News