मुलीच्या लग्नाची चिंता सोडा… मिळतील अर्ध्या कोटीपर्यंत पैसे; वाचा हे बेस्ट 3 प्लॅन

आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता प्रत्येक पालकाला सतावत असते. सध्या महागाई लक्षात घेता, मुलीचे लग्न हा प्रत्येक पालकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. काही पालक आपल्या मुलीच्या लग्नापर्यंत निधी जमवून ठेवतात. परंतु अनेकांना मुलीच्या लग्नापर्यंत मोठा निधी कसा जमवायचा याचे ज्ञान नसते. आज आम्ही तुम्हाला मुलीच्या लग्नापर्यंत लाखो रुपये जमविणारे तीन बेस्ट प्लॅन सांगणार आहोत.

1. सुकन्या समृद्धी योजना

मुलींच्या लग्नासाठी सरकारने काढलेली ही एक सर्वोत्तम योजना आहे. या योजनेत 10 वर्षांच्या आतील मुलीच्या नावे खाते उघडता येते. यात दरवर्षी दीड लाख रुपये जमा करता येतात. ही गुंतवणूक 15 वर्षांसाठी करावी लागते. योजनेचा परिपक्वता कालावधी हा 21 वर्ष आहे. जर तुम्ही दरवर्षी 1 लाख रुपये 15 वर्षे जमा केले तर तुम्हाला या रकमेवर 8.2 टक्के व्याज मिळते. म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्हाला 15 लाखांचे 46 लाख 18 हजार 385 रुपये मिळतात.

2. पीपीएफ योजना

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ ही योजना पोर्टामार्फत चालविली जाते. यामध्ये तुम्हाला 15 वर्षांसाठी दरवर्षी 1.50 लाख रुपये गुंतवता येतात. दरवर्षी या योजनेचा व्याजदर बदलतो. सध्या या योजनेवर 7.1 टक्के व्याजदर दिला जातो. दरवर्षी एक लाखाप्रमाणे तुम्ही 15 वर्षे पैसे गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 27 लाख 12 हजार 139 रुपये मिळतात.

3. मॅच्युअल फंडात एसआयपी

मुलींच्या लग्नासाठी मॅच्युअल फंडात एसआयपी हाही एक चांगला पर्याय ठरतो. ही योजना शेअर बाजारशी संबंधित आहे. ही गुंतवणूक दिर्घकाळ असल्याने त्यात जोखीम कमी असते. त्यातून सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो. दरमहा आठ हजार रुपयांची एसआयपी तुम्ही 15 वर्षे केली तर, मॅच्युरिटीवर तुम्हाला 38 लाख 7 हजार 451 रुपये मिळतात.