Sumeet Bagadia Stock : काल बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर मार्केट मध्ये थोडी स्थिरता दिसून आली आहे. शेअर बाजाराचा आठवड्याचा शेवट सकारात्मक नोटवर झालाय.
अमेरिकी सरकार पुन्हा सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारातील अनिश्चितता कमी झाली, त्यासोबत देशांतर्गत कंपन्यांचे मजबूत तिमाही निकाल आणि बिहार निवडणुकीतील अनुकूल निकाल यांचा गुंतवणूकदारांच्या भावनेवर चांगला परिणाम झाला आहे.

याचा थेट फायदा सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या प्रमुख निर्देशांकांना झाला. शुक्रवारी निफ्टी 50 निर्देशांक 0.12 टक्क्यांनी वाढून 25,910.05 अंकांवर बंद झाला. तर बीएसई सेन्सेक्स 0.1 टक्क्यांनी वाढून 84562.78 या स्तरावर स्थिरावला.
संपूर्ण आठवड्यात दोन्ही निर्देशांकांत सुमारे 1.6 टक्के वाढ नोंदवली गेली. विस्तृत बाजारातही खरेदीचीच भावना दिसली आहे. स्मॉल-कॅप निर्देशांकाने सुमारे 1 टक्के तर मिड-कॅप निर्देशांकाने जवळपास 1.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
त्यामुळे बाजारात चांगली मजबुती दिसून आली आहे आणि ही बाब सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी सुद्धा मोठी सकारात्मक आहे. अशातच आता चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमीत बगाडिया यांनी गुंतवणूकदारांसाठी काही शेअर सुचवलेले आहेत.
त्यांनी असे सांगितले आहे की, निफ्टी 25,750 च्या वर टिकून असल्यामुळे बाजारातील एकूणच धारणा सकारात्मक आहे. मात्र, वरच्या बाजूस 26,100 ही एक महत्त्वाची प्रतिरोधक पातळी आहे. आता या श्रेणीच्या वर किंवा खाली ब्रेकआऊट झाल्यास पुढील ट्रेंड स्पष्ट होऊ शकतो.
तसेच त्यांनी सोमवारच्या ट्रेडिंग सत्रासाठी गुंतवणूकदारांना तीन शेअर सुचवलेले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांनी जर तांत्रिक दृष्ट्या मजबूत दिसणाऱ्या शेअर्सची निवड केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असा सल्ला सुद्धा दिला आहे.
दरम्यान आता आपण 17 नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदारांसाठी बागडिया यांनी कोणते शेअर्स सुचवले आहेत आणि यासाठी काय टार्गेट प्राईस देण्यात आली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न
SBI – स्टेट बँक ऑफ इंडिया चा शहर 967 रुपयांवर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे तसेच या स्टॉक साठी बागडिया यांनी 1 हजार 40 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. त्यासाठी 934 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा पण सल्ला देण्यात आला आहे.
ETERNAL – या शेअर्समध्ये पण आता स्थिरता दिसत आहे. त्यामुळे बागडिया यांनी यासाठी बाय रेटिंग दिली आहे. आज टॉक 304 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 324 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित आहे. यासाठी 252 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
BEL – हा स्टॉक 426.85 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 460 रुपयांची टार्गेट प्राईस ठरवण्यात आली आहे. तसेच 410 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.













