दीर्घ कालावधीत पैसा मिळवून देईल सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर! मिळाली महत्त्वाची अपडेट

शेअर मार्केटची आजच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हापासूनच मार्केटमध्ये तेजीचे वातावरण पाहायला मिळाले.सेन्सेक्स व निफ्टी अशा दोन्ही ठिकाणी ही तेजी दिसून आली. कित्येक दिवसाच्या घसरणीनंतर मात्र आज बाजारामध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साह दिसून आला.

Ratnakar Ashok Patil
Published:
suzlon energy share

Suzlon Share Price:- शेअर मार्केटची आजच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हापासूनच मार्केटमध्ये तेजीचे वातावरण पाहायला मिळाले.सेन्सेक्स व निफ्टी अशा दोन्ही ठिकाणी ही तेजी दिसून आली. कित्येक दिवसाच्या घसरणीनंतर मात्र आज बाजारामध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साह दिसून आला.

जर आपण बघितले तर बऱ्याच टॉप कंपन्यांचे शेअर आज वधाल्याचे दिसले व यामध्ये सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये देखील वाढ पाहायला मिळाली. मागील तीन दिवसापासून घसरणीच्या मार्गावर असणारा हा शेअर आज 4.43 टक्क्यांनी वाढला व या वाढीसह 56.86 रुपयांवर पोहोचला.

सुझलॉन एनर्जीचे मार्केट कॅप आहे 74 हजार 896 कोटी रुपयांचे
अक्षय ऊर्जा क्षेत्रातील प्रसिद्ध असलेली सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 74 हजार 896 कोटी रुपये आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये या कंपनीचे काम मोठे असून दीर्घ कालावधीच्या दृष्टिकोनातून या कंपनीचा शेअर उत्तम परतावा देऊ शकतो असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

इतकेच नाही तर डिसेंबर 2024 मध्ये क्रिसिल रेटिंगने या कंपनीवरील क्रेडिट रेटिंग क्रिसिल A मध्ये अपडेट केले होते व यावरून या कंपनीची उत्तम कामगिरी आणि सुधारित नफा मिळू शकेल अशी एक सगळी शक्यता अधोरेखित झाली होती.

सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकची किंमत काय आहे?
या कंपनीच्या शेअरने एक आठवड्यामध्ये जवळपास 4.55 टक्क्यांचा परतावा दिला आहे. परंतु जर मागील महिन्याभराची कामगिरी बघितली तर त्यामध्ये 14.32% ची घसरण देखील पाहायला मिळाली आहे व त्यासोबतच गेल्या तीन महिन्यांमध्ये देखील 27% ची घसरण यामध्ये झाली.

या सगळ्यामध्ये मात्र एक वर्षाची सरासरी काढली तर या शेअरने जवळपास 29.67 टक्क्यांचा परतावा दिला आहे व दोन वर्षात 457 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा गुंतवणूकदारांना दिलेला आहे. पाच वर्षाचा विचार केला तर सुझलॉन एनर्जीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 2372.17% चा परतावा दिला आहे.

तसेच तिसऱ्या तिमाहीत या कंपनीच्या महसुलामध्ये तब्बल 77 टक्क्यांची वाढ होऊन तो 2762.9 कोटी रुपयांवर पोहोचेल असा एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच तिसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ नफा 55% ने वाढून 315.4 कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

या शेअरच्या बाबतीत नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीस ब्रोकरेज फर्मने अंदाज वर्तवला आहे व त्यानुसार तिसऱ्या तिमाहीमध्ये ऑपरेशनल पातळीवर या कंपनीचा EBITDA 67 टक्क्यांनी वाढून 413.1 कोटी रुपयांवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe