गुंतवणूकदारांना धक्का! Suzlon Share मध्ये सतत घसरण.. पुढे काय होणार? वाचा तज्ञांचे भाकीत

भारतीय शेअर बाजारात आज अस्थिरतेचे वातावरण दिसून आले.सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांसाठी हा शेअर सावधगिरीने हाताळण्याची गरज आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Suzlon Energy Share Update:- भारतीय शेअर बाजारात आज अस्थिरतेचे वातावरण दिसून आले.सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांसाठी हा शेअर सावधगिरीने हाताळण्याची गरज आहे.

गुरुवार ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी शेअर बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरणीसह व्यापार करत होते.

बीएसई सेन्सेक्स १७२.४६ अंकांनी घसरून ७८,०९८.८२ वर आणि एनएसई निफ्टी-५० ८४.१५ अंकांनी घसरून २३,६१२.१५ वर बंद झाला. या घसरणीमुळे अनेक स्टॉक्स प्रभावित झाले असून.सुझलॉन एनर्जीच्या शेअरवरही त्याचा परिणाम दिसून आला.

सुझलॉन शेअरचा आजचा परफॉर्मन्स

सकाळी बाजार सुरू होताच सुझलॉन एनर्जीच्या शेअरने ५५.९१ रुपयांवर व्यापार सुरू केला आणि दिवसातील उच्चांक ५६.३८ रुपये गाठला. मात्र दुपारी ३:३५ वाजता हा शेअर ५४.९२ रुपयांवर व्यापार करत होता.

जो मागील बंद किमतीपेक्षा १.७८ टक्क्यांनी खाली होता. दिवसातील नीचांक ५४.५५ रुपये होता. तर ५२ आठवड्यांचा उच्चांक ८६.०४ रुपये आणि नीचांक ३५.५० रुपये होता.

यावरून शेअरच्या हालचालीत मोठा चढ-उतार असल्याचे स्पष्ट होते. ट्रेडिंग व्हॉल्यूमही लक्षणीय वाढला असून एकूण ४.३४ कोटीहून अधिक शेअर्सची देवाणघेवाण झाली आहे.

सुझलॉन एनर्जीच्या शेअरची मागच्या महिन्यातील कामगिरी

गेल्या काही महिन्यांत सुझलॉन एनर्जीच्या शेअरने गुंतवणूकदारांना संमिश्र परतावा दिला आहे. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये ४.८९ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मागील एका महिन्यात तो ६.६३ टक्क्यांनी खाली आला आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर १७ टक्क्यांनी घसरला असून वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत त्यात १५.८३ टक्क्यांची घट झाली आहे.

मात्र मागील एका वर्षात याने १४.५६ टक्क्यांचा नफा दिला आहे. त्यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी तो दबावाखाली असला तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो.

कंपनीची सध्याची स्थिती

सुझलॉन एनर्जीचे एकूण बाजार भांडवल ७४,४१५ कोटी रुपयांवर पोहोचले असून कंपनीचे पी/ई गुणोत्तर ६३.६ आहे. कंपनीवर २७७ कोटी रुपयांचे कर्ज असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्याच्या आर्थिक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे.

तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजारात तेजी किंवा मंदीचा थेट परिणाम सुझलॉन एनर्जीच्या शेअरवर होत असून त्यामुळे अल्पकालीन ट्रेडिंगसाठी हा शेअर जोखीमदार ठरू शकतो.

काय आहे तज्ञांचे मत?

बाजार विश्लेषकांनी दिलेल्या मतांनुसार, गुंतवणूकदारांनी हा शेअर ‘होल्ड’ करावा का विक्री करावी याचा निर्णय आपल्या जोखीम क्षमतेनुसार घ्यावा. वेल्थमिल्स सिक्युरिटीजच्या इक्विटी स्ट्रॅटेजी संचालक क्रांती बाथिनी यांच्या मते, सुझलॉन एनर्जीने डिसेंबर २०२४ तिमाहीत चांगली कामगिरी केली होती.

महसूल आणि नफ्यात वाढ दिसून आली, परंतु ही वाढ कायम राहते की नाही, यावर पुढील गुंतवणुकीचा निर्णय अवलंबून असेल. उच्च जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा शेअर ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला जात आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष (रिटेल रिसर्च) रवी सिंग यांच्या मते, सध्या हा शेअर तांत्रिकदृष्ट्या कमकुवत स्थितीत आहे. जर तो ५५ रुपयांच्या खाली बंद झाला तर पुढील काही दिवसांत तो ४८ रुपयांच्या स्तरावर जाऊ शकतो. याचवेळी एंजल वनचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक ओशो कृष्णन यांनी सांगितले की, ५० रुपयांच्या आसपास या शेअरला सपोर्ट मिळू शकतो.

तर ६२ रुपयांच्या वर मोठा प्रतिकार आहे. जर शेअरने हा प्रतिकार पातळी ओलांडली तर पुढील तेजीची शक्यता निर्माण होऊ शकते.अन्यथा तो दबावाखाली राहील.

सध्याच्या बाजारस्थितीचा विचार करता, नवीन गुंतवणूकदारांनी थांबून पाहण्याची गरज आहे. तर आधीच गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी स्टॉपलॉससह ट्रेडिंग करावे.

अल्पकालीन ट्रेडर्सनी घाईगडबड करू नये आणि बाजारातील ट्रेंड बघून पुढील निर्णय घ्यावा. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला पाहिजे आणि भविष्यातील वाढीच्या शक्यतांवर आधारित निर्णय घ्यावा.

शेवटी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या जोखीम क्षमतेचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे अचानक मोठ्या हालचाली होऊ शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढील पावले उचलावीत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe