सोन्याची खरेदी करण्याला भारतामध्ये अगदी खूप वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. सोन्याची खरेदी प्रामुख्याने दागिने बनवणे तसेच गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासोबतच घरामध्ये जर लग्नकार्य इत्यादी समारंभ असेल तर लग्नसराईच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करण्याचा ट्रेंड आपल्याला दिसून येतो.
सध्या जर आपण सोन्याचे दर पाहिले तर अत्यंत उच्चांकी पातळीवर असून तरी देखील सोन्याच्या खरेदीमध्ये थोडी देखील घट झालेली नाही. यावरून आपल्याला सोने खरेदीचा ट्रेंड दिसून येतो. परंतु जेव्हा आपण सोने खरेदी करतो तेव्हा काही दृष्टिकोनातून फसवणूक होण्याची देखील शक्यता असते.
त्यामुळे महागडे असे सोने खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्या हिताचे ठरते. याकरिता आपण या लेखात सोने खरेदी करताना फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
सोन्याची खरेदी करा परंतु या गोष्टींची घ्या काळजी
1- हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच खरेदी करावी– जेव्हाही तुम्ही सोने खरेदी करायला जाल तेव्हा सर्वात महत्वाची काळजी घेणे म्हणजेच तुम्ही जे दागिने खरेदी करत आहात ते हॉलमार्क असलेले आहेत की नाही हे पाहणे गरजेचे आहे. बीआयएस हॉलमार्क दागिने हे शुद्ध सोन्याची ओळख असून त्यामुळे सोने खरेदी करताना हॉलमार्क आहे की नाही हे पाहूनच सोन्याची खरेदी करण्याची काळजी घ्यावी.
2- सोन्याचे वजन तपासणे– सोन्याची खरेदी करताना तुम्ही खरेदी करत असलेले सोने तुम्हाला ज्या वजनाची घ्यायची आहेत त्याच वजनाचे आहे की नाही हे तपासून बघणे खूप गरजेचे आहे. कारण सोने हे प्रचंड महाग असल्यामुळे थोडे जरी वजनामध्ये चढउतार असला तरी देखील तुमच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सोने खरेदी करताना त्याचे वजन तपासून घेणे खूप गरजेचे असते.
3- सोन्याची शुद्धता तपासणे– सोन्याची प्युरिटी म्हणजे शुद्धता तपासून घेणे खूप गरजेचे असून त्यानंतर सोने खरेदी करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहे की 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध सोने मानले जाते.
परंतु सामान्यपणे बघितले तर सोन्याचे दागिने 18 ते 22 कॅरेट मध्येच बनवले जातात व यामध्ये काही इतर धातूंचे मिश्रण असते. व्यतिरिक्त 24 कॅरेट सोन्यापासून दागिने न बनवता सोन्याच्या नाणी बनवून ते विक्री केले जातात. साधारणपणे 22 कॅरेटचे सोने दागिने तयार करण्यासाठी वापरले जाते व या दृष्टिकोनातून सोने शुद्ध आहे की नाही याची काळजी घ्यावी.
4- सोने खरेदीची पावती घ्यावी– सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोन्याची खरेदी केल्यानंतर सोनाराकडून बिल घ्यायला विसरू नये. तसेच घेतलेल्या बिलावर मेकिंग चार्ज आणि जीएसटी इत्यादी संबंधी माहिती आहे की नाही याची देखील खात्री करून घ्यावी. त्यामुळे सोने खरेदी करताना बिल सोबत ठेवावे व बिल सोबत असले तर तुम्ही सोने खरेदी केल्याचा पुरावा कायम राहतो व ते कुणाकडून खरेदी केले याचा देखील पुरावा राहतो.
5- दागिने तयार करा लागणारे चार्जेस तपासा– सोन्याचे दागिने तयार करताना मेकिंग चार्जेस सारखे इतर चार्ज देखील लावले जातात. त्यामुळे तुम्ही सोन्याच्या दागिने खरेदी करताना नेहमी मेकिंग चार्जेस वर बोलणे गरजेचे आहे. जर तुम्ही यामध्ये चांगली वाटाघाटी ज्वेलर्स सोबत केली तर मेकिंग चार्जेस कमी होऊ शकतात
याचा फायदा तुम्हाला पैसे वाचवण्यामध्ये होऊ शकतो. यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे दागिन्यांची जी काही एकूण किंमत असते त्यामध्ये मेकिंग चार्जेसचा हिस्सा 30 टक्के असतो व यामुळे सोनारांना खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे सोने खरेदी करण्या अगोदर मेकिंग चार्जेस पाहून घेणे व त्यावर चर्चा करून वाटाघाटी करणे महत्त्वाचे ठरते.