Tata Car: टाटाच्या कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! होतील 1.55 लाखापर्यंत स्वस्त…कधी लागू होतील नवीन किमती?

Published on -

Tata Car:- सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला आहे. अगोदर जीएसटी मध्ये चार स्लॅब होते व आता चार वरून फक्त दोनच स्लॅब यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. या नवीन बदलामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू तसेच काही वाहने स्वस्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सने देखील त्यांच्या वाहनांच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केलेली आहे व याबाबत इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्त बघितले तर त्यानुसार 22 सप्टेंबर पासून टाटाच्या गाड्या 65 हजार रुपयांपासून ते 1.55 लाख रुपये पर्यंत स्वस्त होणार आहेत.

केंद्र सरकारने जीएसटी दरांमधील बदलाला मंजुरी दिल्यानंतर टाटा कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे 3 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक झाली व यामध्ये छोट्या गाड्यांवरील कर 28 वरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

350 सीसी पर्यंतच्या छोट्या कार आणि बाईक होतील स्वस्त

या बदलानुसार बघितले तर 1200 सीसी पर्यंतच्या पेट्रोल वाहनांवरील किंवा 1500 सीसी पर्यंतच्या डिझेल वाहनांवरील जीएसटी आता 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला असून यामुळे मारुती स्विफ्ट तसेच अल्टो आणि नेक्सन सारख्या छोट्या कार स्वस्त होण्यास मदत होणार आहे व त्यासोबतच होंडा शाईन तसेच होंडा एक्टिवा सारख्या 350cc पर्यंतच्या बाईक देखील स्वस्त होणार आहेत.

इतकेच नाही तर या जीएसटी बदलांमध्ये आता बस तसेच ट्रक आणि रुग्णवाहिका इत्यादी व्यवसायिक वाहनांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तसेच लक्झरी कार वरील जीएसटी मात्र 28 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे व त्यामुळे बीएमडब्ल्यू किंवा ऑडी सारख्या लक्झरी कारच्या किमतींमध्ये मात्र जास्त बदल दिसून येणार नाही. परंतु त्या थोडेसे स्वस्त होऊ शकतात.

कारण अगोदर या लक्झरी कार्सवर जीएसटी सोबतच भरपाई उपकर देखील आकारला जात होता व या नवीन स्लॅबमध्ये मात्र हा भरपाई उपकर रद्द करण्यात आलेला आहे. हा भरपाई उपकर 28 टक्के जीएसटी व्यतिरिक्त 17 ते 22 टक्के इतका आकारला जात होता व त्यामुळे लक्झरी कारवरील एकूण कर 50 टक्क्यांपर्यंत पोहोचत होता व त्यामुळे या कार खूप महाग झालेल्या होत्या. परंतु हा उपकर आता रद्द करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात या लक्झरी कार स्वस्त होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe