TATA समूहाचे शेअर्स ५१% पर्यंत झाले स्वस्त! गुंतवणूकदारांनी संधीचे सोने करावे की थांबावे?

देशांतर्गत शेअर बाजारात सध्या मोठ्या अस्थिरतेचे वातावरण आहे. याच कालावधीत देशाचा प्रमुख औद्योगिक समूह टाटा समूहच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली आहे. इक्विटीच्या विश्लेषणानुसार टाटा समूहाचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवरून जवळपास ५१% पर्यंत घसरले आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:

Tata Group Share Update:- देशांतर्गत शेअर बाजारात सध्या मोठ्या अस्थिरतेचे वातावरण आहे. याच कालावधीत देशाचा प्रमुख औद्योगिक समूह टाटा समूहच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली आहे. इक्विटीच्या विश्लेषणानुसार टाटा समूहाचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवरून जवळपास ५१% पर्यंत घसरले आहेत.

२७ सप्टेंबर २०२३ रोजी बीएसई सेन्सेक्स ८५,९७८ अंकांवर पोहोचला होता.तर २७ जानेवारी २०२४ रोजी तो ७५,३६६ अंकांवर घसरला आहे. ज्यामुळे या कालावधीत सेन्सेक्समध्ये १२% ची घट झाली आहे.

टाटा समूहाचा व्यवसाय अनेक विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. यामध्ये आयटी, ऑटोमोबाईल्स, हॉस्पिटॅलिटी, भांडवली वस्तू, केमिकल्स, टेलिकॉम, पॉवर इत्यादींचा समावेश आहे. साधारणपणे या समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

आयटी क्षेत्रातील घसरण

टाटा समूहातील टीसीएसचे शेअर्स सध्या स्थिर आहेत आणि १.५१% वाढीसह ४०९७.२५ रुपये वर व्यापार करत आहेत. तथापि त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४,५८६ रुपये होता आणि तेव्हापासून शेअरमध्ये ११% ची घसरण झाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य कंपन्या टाटा एलेक्ससी आणि टाटा टेक्नॉलॉजीज या शेअर्समध्ये अनुक्रमे ३२% आणि ३६% ची घसरण झाली आहे.

ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील घसरण

टाटा मोटर्सचे शेअर्सही ४०% घसरले आहेत.कारण त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १,१७९ रुपये होता. सोमवारी टाटा मोटर्सचे शेअर्स ७१३ रुपये वर आले होते. या वर्षात ऑटोमोबाईल्स स्टॅम्पिंग आणि असेंब्ली विभागात ४९% आणि ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा मध्ये ५१% ची घसरण झाली आहे.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील शेअर्समधील घसरण

टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपन्यांमध्येही घसरण दिसून येत आहे. बनारस हॉटेल्सचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ८% घसरले आहेत.

त्याचप्रमाणे द इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स १५% आणि ओरिएंटल हॉटेल्सचे शेअर्स २२% ने कमी झाले आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असली तरी, इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स २.०२% वाढीसह ७६८.४० रुपये वर व्यापार करत आहेत.

ग्राहकोपयोगी वस्तू आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील घट

व्होल्टास आणि नेल्को यांच्या शेअर्समध्ये २७% आणि ३३% च्या दराने घसरण झाली आहे. टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंटच्या शेअर्समध्ये ३५% घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

ट्रेंटच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८,३४६ रुपये होता, आणि तो ५,४१२ रुपये वर घसरला आहे. तथापि आज बीएसईवर ट्रेंटच्या शेअर्समध्ये २.२५% वाढ होऊन ते ५५७०.६५ रुपये वर व्यवहार करत आहेत.

भांडवली वस्तू आणि केमिकल्स क्षेत्रातील घसरण

आर्टसन, टीआरएफ, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा केमिकल्स, आणि रॅलिस इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १९%, ४२%, ३९%, ३०%, आणि ३८% च्या दराने घसरण झाली आहे. टाटा केमिकल्सच्या शेअर्समध्ये एक दिवसात १.२५% वाढ दिसून आली असून ते ९५३.१० रुपये वर व्यापार करत आहेत.

टेलिकॉम आणि पॉवर क्षेत्रातील घसरण

टाटा समूहाच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली आहे. टाटा कम्युनिकेशन्सचे शेअर्स २८%, टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्राचे शेअर्स ३८%, आणि तेजस नेटवर्क्सचे शेअर्स ४०% घसरले आहेत. याशिवाय टाटा पॉवरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा २९% कमी झाले आहेत. ज्यामुळे टाटा पॉवरचे शेअर्स सध्या ३५० रुपये वर ट्रेड करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe