टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलचे शेअर्स लिस्टिंगनंतर आपटले ! Buy करावे की Sell, तज्ञांचा सल्ला काय ?

Published on -

Tata Motors Commercial Vehicle : टाटा मोटर्सच्या डीमर्जरनंतर सगळ्यांचे लक्ष होते ते टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स (TMCV) चे शेअर्स कधी लिस्टिंग होणार? दरम्यान आज टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलच्या शेअर्सची लिस्टिंग झाली आहे. पण शेअर्स लिस्टिंग नंतर मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाली.

TMCV चे शेअर्स आज 12 नोव्हेंबर रोजी 28% प्रीमियमने सूचीबद्ध झालेत. कंपनीचे शेअर्स NSE वर 335 रुपयांवर सूचीबद्ध झालेत, जे की 260.75 रुपयांच्या अपेक्षित किमतीपेक्षा 28.5% जास्त होते. तसेच हे शेअर्स BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 330.25 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते.

दरम्यान लिस्टिंगनंतर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्सचे शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर सुरुवातीच्या टप्प्यात 345 रुपयांच्या इंट्राडे High वर पोहोचलेत. पण नंतर अनेकांनी नफावसुली सुरू केली आणि यामुळे शेअरच्या किमती घसरत गेल्यात.

ट्रेडिंग करणाऱ्यांनी नफा वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री केली आणि यामुळे स्टॉकची किंमत 320 रुपयांपर्यंत खाली आली. सध्या नव्याने लिस्टेड झालेल्या या कंपनीचे शेअर्स 320 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.

मात्र शेअर्समध्ये झालेली घसरण गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेकांच्या माध्यमातून या कंपनीचे शेअर सेल करावेत, बाय करावे की होल्ड करावे असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आता आपण या संदर्भात तज्ञांकडून काय सांगितले जात आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. 

तज्ञ काय सांगतात? 

डिमर्जरपूर्वी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दीर्घकाळ घसरण झाली आहे. पण आता टाटा मोटर्सचा व्यवसाय दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डिवाइड झाला आहे. प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विभागातील व्यवसाय आता पूर्णपणे वेगळे झाले आहेत.

यामुळे आता गुंतवणूकदारांना असा प्रश्न पडलाय की टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्सचे अधिक शेअर्स खरेदी करावेत, होल्ड करावेत की विकावेत. TMCV चे शेअर्स लिस्टिंग नंतर लगेचच तीन टक्क्यांपर्यंत घसरलेत.

खरेतर, कंपनीच्या व्यवसायासाठी आणि शेअर्ससाठी डिमर्जर फायदेशीर मानले जात आहे. डीमर्जरआधी अँबिट कॅपिटलच्या विश्लेषकांनी आघाडीची बाजारपेठ, उद्योगाशी तुलनात्मक मार्जिन आणि मजबूत सीएफओ संरचना यामुळे, व्यावसायिक वाहन विभागा साठी डिमर्जर फायद्याचे राहणार असा दावा करण्यात आला होता.

ह्या ब्रोकरेजने म्हटले होते की, जागतिक पोहोच आणि इव्हेको अधिग्रहण कंपनीच्या पुनर्मूल्यांकनाला गती देणारा राहणार आहे. डिमर्जर धोरणात्मक लक्ष केंद्रित करेल, ऑपरेशनल स्वातंत्र्य देईल आणि बाजार मूल्यांकन सुधारण्यासाठी अनुकूल राहू शकते असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता.

पण, इतर काही विश्लेषकांनी TMCV शेअर्सच्या किमतीत लिस्टिंगनंतर काही अस्थिरता पाहायला मिळू शकते असे सांगितले होते आणि त्यांनी गुंतवणूकदारांना आधीच सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

बोनान्झा रिसर्च अॅनालिस्ट अभिनव तिवारी यांनी निर्देशांक समायोजन आणि पोर्टफोलिओ समायोजन दरम्यान शेअर्सच्या किमतीला तांत्रिक जोखीमांचा सामना करावा लागत असल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी असे म्हटले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी अलीकडेच लिस्टेड झालेल्या टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचे शेअर्स ताबडतोब खरेदी करण्यापेक्षा ते वॉच लिस्टमध्ये ठेवायला हवे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe