Tata Power Share:- आज मंगळवारी शेअर बाजारामध्ये बऱ्यापैकी तेजी पाहायला मिळाली व सेन्सेक्स 416 अंकाच्या वाढीसह 76746 पातळीवर व्यवहार करत आहे तर निफ्टीमध्ये देखील आज 132 अंकांची वाढ नोंदवण्यात आली व निफ्टी 23218 च्या पातळीवर सध्या व्यवहार करत आहे. जर आपण सेन्सेक्सच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये 30 समभागांपैकी 27 समभागांमध्ये वाढ पाहायला मिळाली तर तीन मध्ये घसरण पाहायला मिळाली. इतकेच नाही तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 28 वाढत आहेत आणि 21 घसरत आहेत.
या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण आज टाटा पावर लिमिटेड कंपनीच्या शेअरची स्थिती जर बघितली तर त्यामध्ये आज 4.77% टक्क्यांची वाढ दिसून आली व या वाढीसह हा शेअर्स 356.15 रुपयांवर पोहोचला.
सोमवारी हा शेअर 339.95 वर बंद झाला होता व आज 356.15 रुपयांवर पोहोचला. या वाढीमागील प्रमुख कारण बघितले तर टाटा पावर लिमिटेडने डिसेंबर तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला दिली असल्याने हा परिणाम दिसून आल्याचे तज्ञांचे मत आहे.
टाटा पॉवर स्टॉक एक्सचेंज अपडेट
टाटा पावर लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली व त्यामध्ये म्हटले की, डिसेंबर तिमाहीच्या करण्यात आलेल्या ऑडिट नुसार आर्थिक निकालांवर चर्चा करण्यासाठी 4 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक होणार असल्याची माहिती कंपनीने दिली व त्यानंतर या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी दिसून आली.
टाटा पॉवरची भूतानमध्ये गुंतवणुक
डिसेंबर महिन्यामध्ये टाटा पावर लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून भूतानमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली गेली होती व या कंपनीचे सीईओ प्रवीर सिन्हा यांनी भूतानच्या खोर्लोचु जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाल्याची देखील माहिती दिली होती व याकरिता 6 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.
या सगळ्या सकारात्मक बाबींची परिणीती या शेअरच्या तेजीच्या रूपाने दिसून आली. कंपनीने या प्रकल्पाबद्दल माहिती देताना म्हटले की पूर्व भूतान मधील खोलोगचू नदीवरील सहाशे मेगावाटचा हा प्रकल्प सप्टेंबर 2029 पर्यंत कार्यान्वित होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मोतीलाल ओसवाल टारगेट प्राईस
देशातील टॉप ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टाटा पॉवर कंपनीच्या शेअर करिता बाय रेटिंग दिले असून त्याकरिता 509 रुपयांची टारगेट प्राईस देखील जाहीर केली आहे. त्यामुळेच दीर्घ कालावधी गुंतवणुकीसाठी टाटा पॉवरचा शेअर मालामाल करू शकतो अशी परिस्थिती दिसून येत आहे.
टाटा पावर शेअर रिटर्न्स
जर मागच्या एक महिन्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या शेअर्सने 16.30 टक्क्यांचा परतावा दिला व मागच्या सहा महिन्यांमध्ये मात्र यामध्ये 18.94 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.
तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे मागच्या एक वर्षात या शेअर्स मध्ये 0.77% घसरण झालेली आहे व मागील पाच वर्षात मात्र या शेअर्सने 478.64 टक्क्यांचा परतावा दिला आहे व अशा पद्धतीने दीर्घ कालावधी म्हणजेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअर्सने 3391.67% चा परतावा दिला आहे.