Tata Share Price : या वर्षात टाटा समूहाचे काही शेअर्स असे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरलेत. शेअर मार्केट मधील चढउताराचा टाटा समूहाच्या शेअर्सला मोठा फटका बसला.
समूहाच्या काही शेअर्सने गुंतवणूकदारांना अक्षरशः निगेटिव्ह रिटर्न दिलेत आणि यामुळे गुंतवणूकदारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. मात्र आता टाटा समूहाचा एक शहर आपल्या गुंतवणूकदारांना येत्या काळात मालामाल बनवेल असा विश्वास ब्रोकरेज कडून व्यक्त केला जातोय.

जसं की आपणास ठाऊकच आहे की टाटा समूहाच्या टाटा मोटर्सने अलीकडेच आपल्या बिझनेसचे विभाजन केले आहे. टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल आता वेगळे झाले आहे. दरम्यान हाच टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलचा स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना फायद्याचा सौदा ठरू शकतो.
खरे पाहता टाटा समूहाचे शेअर्स नेहमीच मार्केटमध्ये चर्चेचा विषय ठरतात आणि टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा सुद्धा मिळवून दिला आहे.
दरम्यान आता पुन्हा एकदा समूहाची टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल ही कंपनी चर्चेत आली आहे आणि येत्या काळात या शेअर्समधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळतील असा विश्वास व्यक्त होतोय.
जागतिक ब्रोकरेज फर्म नोमुराने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला म्हणजेच यासाठी बाय रेटिंग दिली आहे. टाटा मोटरच्या कमर्शियल व्हेईकल ची मागणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
टाटाचे ट्रक्स आणि अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची मागणी येत्या काळात फारच वाढेल आणि याचा कंपनीला फायदा होईल परिणामी गुंतवणूकदार देखील यातून चांगले पैसे कमावणार आहेत. यामुळे ब्रोकरेज कडून हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
स्टॉकची शेअर मार्केट मधील कामगिरी?
22 डिसेंबर रोजी या कंपनीचे स्टॉक 5% वाढलेत. आज पुन्हा यामध्ये वाढ पाहायला मिळाली, काल हा स्टॉक 414 वर पोहोचला आणि आज या शेअरची किंमत 425 रुपयांच्या आसपास आहे.
ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल 1.51 लाख कोटी रुपये इतके आहे. दरम्यान आता ब्रोकरेज फर्म बोफा सिक्युरिटीजने या शेअर साठी 475 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली असून शेअर्स खरेदीचा सल्ला सुद्धा दिला आहे. तसेच जेपी मॉर्गनने या शेअर्सला ओवरवेट रेटिंग दिली आहे आणि यासाठी 475 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.