Tata Share : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओ मध्ये टाटा समूहाचे शेअर्स आवर्जून ठेवतात. दरम्यान टाटा समूहाच्या एका शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 30 दिवसांच्या काळात जबरदस्त रिटर्न दिले आहेत. समूहातील दिग्गज कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 60% रिटर्न दिले आहेत.
यामुळे पुन्हा एकदा हा शेअर चर्चेत आला आहे. महत्वाची बाब म्हणजे त्या काळात कंपनीच्या स्टॉकमध्ये आणखी तेजी येणार आहे. कारण की या कंपनीने आता आपल्या शेअर होल्डर साठी एक मोठा निर्णय घेतलाय.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आपल्या शेअर्सचे विभाजन करणार आहे. स्टॉक Split ची घोषणा झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी आली आहे. बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली. सध्या कंपनीचे स्टॉक 10,963 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
एका महिन्यात गुंतवणूकदार मालामाल
गेल्या 5 वर्षांत टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. लॉंग टर्म मध्ये हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी लकी ठरलाय. 60 महिन्यांमध्ये या स्टॉकने आपल्या शेअर होल्डर्सला 1180%,रिटर्न दिलेत. हा शेअर्स ऑक्टोबर 2020 मध्ये याच्या शेअरची किंमत 840 रुपयांच्या दरम्यान होती.
गेल्या चार वर्षांत शेअर्सने 650% परतावा दिला आहे. तसेच मागील तीन वर्षांत या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 370 टक्के नफा मिळाला आहे. याच्या शेअर्सने प्लॉटमध्ये सुद्धा चांगला परतावा दिलाय. मागील सहा महिन्यांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 73% रिटर्न दिलेत.
तसेच 30 दिवसांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 60 टक्के रिटर्न दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या पाच दिवसात कंपनीचे शेअर्स 28 टक्क्यांनी वाढले आहेत. एक सप्टेंबरला या शेअरची किंमत 6816.30 होती. पण बुधवारी हा स्टॉक दहा हजार 963 रुपयांवर पोहोचला.
दरम्यान आता कंपनीने स्टॉक Split अर्थात शेअर्सच्या विभाजनाची मोठी घोषणा केली असल्याने येत्या काळात या स्टॉकची किंमत आणखी वाढणार असा विश्वास व्यक्त होतोय. कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित केली आहे. खरे तर कंपनीने या आधी कधीच शेअरचे विभाजन केलेले नाही.
अर्थात कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट करण्यात येणार आहेत. कंपनी 1:10 ह्या प्रमाणात आपल्या शेअर्सचे विभाजन करणार अशी माहिती एक्सचेंजला देण्यात आली आहे. याचा अर्थ एक शेअर्स 10 भागांमध्ये विभाजित करण्यात येणार आहे.
स्टॉक स्प्लिटची रेकाॅर्ड डेट येत्या अकरा दिवसांनी आहे. अर्थात 14 ऑक्टोबर ही याची रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आलीये. म्हणजे या तारखेपर्यंत ज्या शेअरहोल्डर्सकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.