महत्वाची बातमी ! Tata च्या ‘या’ कंपनीचे डिमर्जर होणार, तयार होणार नवीन कंपनी, गुंतवणूकदारांना मिळणार नव्या कंपनीचे फ्री शेअर्स

Published on -

Tata Share : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. खरे तर आधी सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले जात होते. पण आता शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली जात आहे. यातून गुंतवणूकदारांना चांगला नफा सुद्धा मिळतो. मार्केटचा व्यवस्थित अभ्यास केला तर गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधून चांगले रिटर्न मिळतात.

लॉंग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना अनेक कंपन्यांच्या शेअर्सने चांगला परतावा दिला आहे. दरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी टाटा समूहाकडून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्सचे डीमर्जर करण्यात येणार आहे.

टाटा मोटर्स चा स्टॉक नेहमीच गुंतवणूकदारांमध्ये चर्चेत असतो. या शेअर्सवर अनेक गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवलाय. पण आता टाटा मोटर्सने आपल्या कमर्शियल व्हेईकल बिजनेसला वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने कमर्शियल व्हेईकल बिजनेस विभाजित करून स्वातंत्र्य सूचीबद्ध कंपनी तयार करण्याची घोषणा केली आहे. थोडक्यात कंपनीचे डिमर्जर होणार आहे व हे डिमर्जर आज पासून प्रभावी राहील. टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डर्सला नवीन कंपनीचे शेअर्स 1:1 या प्रमाणात दिले जाणार आहेत.

याची रेकॉर्ड डेट या महिन्यातच आहे. 14 ऑक्टोबर ही याची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. टाटा मोटरच्या या घोषणेनंतर शेअर्स मध्ये तुफान तेजी दिसून येत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कंपनीचा स्टॉक 711.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.

हा निर्णय कंपनीच्या रचनेला अधिक साधे करण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांना पारदर्शकता देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे कंपनीचे मत आहे. दरम्यान आता कंपनीने निश्चित केलेल्या रेकॉर्ड डेटपूर्वी ज्या शेअर होल्डर च्या खात्यात टाटा मोटर्सचे शेअर्स त्यांना नवीन कंपनीचे शेअर्स मिळणार आहेत.

म्हणजे, गुंतवणूकदाराकडे जितके टाटा मोटर्सचे शेअर्स असतील तितकेच शेअर्स त्यांना नव्या कमर्शियल व्हेइकल कंपनीचे सुद्धा मिळणार आहेत. या डिमर्जरनंतर वर्तमान कंपनीचे नाव बदलण्याचाही प्लॅन आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPVL) असे नवीन नाव या कंपनीचे राहणार आहे.

रेकॉर्ड डेटनंतर लगेचच CV युनिटचे शेअर्स एक्स-ट्रेडिंग सुरू होतील, तर नव्या कंपनीचे ट्रेडिंग नोव्हेंबरपासून सुरू होणार अशी माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाकडून समोर आली आहे. पण, त्यासाठी आवश्यक सर्व नियामक मंजुरी वेळेत मिळणे देखील तेवढेच महत्त्वाचे राहणार आहे. सर्व काही व्यवस्थित राहिलं तर नोव्हेंबर पासून नव्या कंपनीची ट्रेडिंग सुरू होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News