टाटा समूहाच्या ‘या’ शेअरमध्ये 5 दिवसात 35 टक्क्यांची वाढ, कारण काय? 

Published on -

Tata Share : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर मार्केटमध्ये सतत चढ उतार सुरू आहेत. गेल्या महिन्यात देखील असाच अनुभव आला होता. या महिन्याची सुरुवात नक्कीच तेजीने झाले आहे. दरम्यान या तेजीत टाटा समूहाच्या एका स्टॉकची जोरदार चर्चा सुरू आहे.

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा शेअर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या पाच दिवसांच्या काळात या स्टॉकच्या किमतीत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. आज या स्टॉक मध्ये तब्बल 12 टक्क्यांची वाढ झाली. आज या स्टॉकची किंमत 11847 रुपयांवर पोहोचली. महत्त्वाची बाब म्हणजे हा या स्टॉकचा ऑल टाईम हाय सुद्धा आहे.

दरम्यान मागील पाच दिवसात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न दिले असल्याने हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. पण या शेअरच्या किमती अचानक का वाढत आहेत, यामागे नेमके कारण काय याबाबत आज आपण या लेखातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेअर्सच्या किंमती वाढण्याचे कारण 

टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. पण यापैकी दोन कारणांमुळे या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला आहे. टाटा कॅपिटलचा आयपीओ व स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा यामुळे या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आयपीओमुळे या कंपनीबाबत सकारात्मकता वाढली आहे. टाटा कॅपिटलने 26 सप्टेंबर रोजी आयपीओची तारीख जाहीर केली. तेव्हापासून, त्यांचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत. टाटा कॅपिटलच्या शेअर्सपैकी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा अंदाजे 2.2% हिस्सा आहे.

टाटा सन्सचा टाटा इन्व्हेस्टमेंटचा अंदाजे 93% हिस्सा आहे. तसेच, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे स्टॉक स्प्लिटची घोषणा. टाटा इन्व्हेस्टमेंटने त्यांचे शेअर्स 1:10 च्या प्रमाणात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा अर्थ असा की प्रत्येक शेअर 10 लहान शेअर्समध्ये विभागला जाईल. या स्टॉक स्प्लिटनंतर, कंपनीच्या शेअर्सचे फेस व्हॅल्यू 10 वरून 1 रुपयावर येणार आहे. स्टॉक Split ची रेकॉर्ड 14 ऑक्टोबर आहे.

थोडक्यात या दोन निर्णयानंतर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्स मध्ये वाढ झाली आहे. नक्कीच ही बाब या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी दिलासादायक ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe