Tata Steel Share Price : मार्केट आज लाल रंगाच्या निशाणीसह उघडला. यामुळे अनेक गुंतवणूकदार अस्वस्थ पाहायला मिळालेत. आज दोन्ही मार्केट निर्देशांक विक्रीच्या दबावासह व्यवहार करत आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की कंपन्या सध्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर करत आहेत.
सोबतच काही कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची सुद्धा मोठी घोषणा केली जात आहे. काही कंपन्या स्टॉक स्प्लिट करत आहेत. यामुळे काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आहेत.

दरम्यान आता देशातील आघाडीच्या स्टील उत्पादक कंपनीने सुद्धा आपले सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
कंपनीला सप्टेंबर तिमाही मध्ये चांगला फायदा झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि अनेक जण या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.
दरम्यान, आता आपण टाटा स्टील कंपनीचे सप्टेंबर तिमाही निकाल कसे आहेत आणि सध्या या कंपनीचा स्टॉक शेअर मार्केट मध्ये कसा परफॉर्मन्स करतोय ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तिमाही निकाल कसे राहिलेत?
सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 319.5 टक्क्यांनी वाढून 3183 कोटी झाला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत यात फार मोठी वाढ झाली आहे.
कंपनीच्या मते, मागणीत सुधारणा, खर्च नियंत्रण आणि व्यवसाय धोरण यामुळे मजबूत तिमाही निकालांना हातभार लागला आहे. सप्टेंबर तिमाहीत टाटा स्टीलचा एकूण महसूल 8.9 टक्क्यांनी वाढून 58,689.3 कोटी इतका झाला.
कंपनीच्या मते, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्टीलची मागणी वाढल्याने विक्रीत वाढ झाली. विशेषतः बांधकाम, ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या महसुलात वाढ झाली. या वर्षी कंपनीच्या कर खर्चात लक्षणीय घट झाली आहे.
टाटा स्टीलचा कर खर्च 26 टक्क्यांनी कमी होऊन 1039.4 कोटी झाला, ज्यामुळे निव्वळ नफ्याला थेट फायदा झाला आहे. कर कपात आणि खर्च नियंत्रणामुळे कंपनीच्या नफ्याच्या मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे.
कंपनीची शेअर मार्केट मधील कामगिरी
आज कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झालेत आणि म्हणूनच टाटा स्टीलचे शेअर्स फोकसमध्ये राहिले आहेत. सकाळी दहा वाजेच्या सुमारास कंपनीच्या शेअर्समध्ये 1.88 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. दहा वाजेला कंपनीचे शेअर्स 182 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत होते. काल या शेअरची क्लोजिंग प्राईस 178.65 रुपये होती.
कालच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा आज शेअर्समध्ये वाढ झाली असल्याने गुंतवणूकदार उत्साहात दिसलेत. दरम्यान मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2.60% रिटर्न दिले आहेत.













