टाटा है तो मुमकिन है ! Tata चा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना देणार बंपर परतावा, जाणार 350 पार, शेअर बाजार तज्ञ म्हणताय आताच खरेदी करा

Tata Stocks

Top Tata Share To Buy : शेअर बाजारात टाटावर विश्वास दाखवणाऱ्या गुंतवणूकदारांना नेहमीच चांगला परतावा मिळाला आहे. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीमध्ये शाश्वत परतावा दिला आहे. अशातच टाटा समूहाच्या टाटा पावरचे शेअर आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असे सांगितले जात आहे.

खरे तर Tata Power चे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत राहत आहेत. आज अर्थात सात डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 18 टक्क्यांनी वाढला आहे. आज 332 रुपयांवर हा स्टॉक ट्रेड करत होता. गेल्या पाच दिवसांचा विचार केला असता या स्टॉक मध्ये 23 टक्के एवढी तेजी आली आहे.

विशेष बाब म्हणजे शेअर मध्ये आलेल्या या विक्रमी तेजीतच या कंपनीने एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. टाटा समूहाची ही कंपनी आता एक लाख करोड रुपये मार्केट कॅपिटल असणारी सातवी कंपनी बनली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी आणि ब्रोकरेज फर्मने देखील टाटा समूहाच्या या स्टॉक वर विश्वास दाखवला आहे. तज्ञांनी या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे.

किती वाढणार भाव ?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तज्ञांनी या स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे मात्र या स्टॉकच्या किमती किती वाढतील ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की बाजारातील तज्ञांनी टाटा पावर चे शेअर्स ३५० रुपये प्रति शेअर पर्यंत जातील असा अंदाज व्यक्त केला आहे. आज या शेअरची किंमत 332 रुपये एवढी होती. म्हणजेच आगामी काळात याच्या किंमती प्रति शेअर 18 रुपये पर्यंत वाढू शकतात असा अंदाज काही तज्ञांनी वर्तवला आहे.

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने या Tata Power च्या स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे. आधी ब्रोकरेज फर्मने गुंतवणूकदारांना हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला होता आणि आता बाय रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर, गुरुवारी टाटा पॉवर लिमिटेडच्या शेअर्समध्ये 13% वाढ झाली आणि विक्रमी उच्चांक गाठला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe