वार्षिक पगार 15 लाख असलेल्यांसाठी जुना टॅक्स स्लॅब चांगला आहे की नवीन टॅक्स लॅब? जाणून घ्या दोघांचे फायदे

जे व्यक्ती आयकर भरतात त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न असतो की, टॅक्स स्लॅबची निवड करताना नव्या टॅक्स स्लॅबची करावी की जुन्या टॅक्स स्लॅबची? याबाबत मोठा संभ्रम दिसून येतो. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार जर बघितले तर जवळपास 67% आयकर भरणाऱ्यांनी नवीन टॅक्स स्लॅब स्वीकारला आहे व तो करण्यात आलेल्या बदलांमुळे फायदेशीर ठरताना दिसून येत आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:
tax slab

Tax Slab:- जे व्यक्ती आयकर भरतात त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न असतो की, टॅक्स स्लॅबची निवड करताना नव्या टॅक्स स्लॅबची करावी की जुन्या टॅक्स स्लॅबची? याबाबत मोठा संभ्रम दिसून येतो. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार जर बघितले तर जवळपास 67% आयकर भरणाऱ्यांनी नवीन टॅक्स स्लॅब स्वीकारला आहे व तो करण्यात आलेल्या बदलांमुळे फायदेशीर ठरताना दिसून येत आहे.

त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की नव्या टॅक्स स्लॅबची जर यामध्ये निवड केली तर जुन्या टॅक्स स्लॅबच्या तुलनेमध्ये कमी टॅक्स भरावा लागेल का? त्यामुळे पंधरा लाख रुपये उत्पन्न असलेल्यासाठी कोणता टॅक्स स्लॅब उत्तम असेल हे आपण या लेखात थोडक्यात समजून घेऊ.

नव्या टॅक्स स्लॅबनुसार 15 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर किती टक्के भरावा लागतो प्राप्तिकर?
प्राप्तिकर भरण्याची तरतूद बघितली तर नव्या टॅक्स स्लॅब नुसार पंधरा वर्षापर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्के इन्कम टॅक्स भरण्याची तरतूद आहे व त्या तुलनेत मात्र जुन्या टॅक्स प्रणालीमध्ये दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के इन्कम टॅक्स लागू आहे.

इतकेच नाही तर यामध्ये 15 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर दोनही कर प्रणालीमध्ये 30% प्राप्तीकराची तरतूद आहे. पंधरा लाख रुपयांच्या उत्पन्नाकरिता जुना किंवा नवा टॅक्स लॅब चांगला आहे का हे समजून घेणे यामध्ये खूप गरजेचे आहे.

जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये पन्नास हजार रुपये पर्यंत स्टॅंडर्ड डिडक्शन मिळते. हे सगळ्यात अगोदर तुमच्या उत्पन्नातून वजा केले म्हणजेच 1500000-50000=14,50,000 रुपये म्हणजेच 14.50 लाख रुपये टॅक्सच्या कक्षेत येतात.

आयकर कायदा कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांची बचत करणे शक्य
त्यानंतर तुम्ही यामध्ये दीड लाख रुपयांची बचत आयकर कायदा कलम 80सी अंतर्गत करू शकतात. परंतु यानुसार जर तुम्हाला दीड लाख रुपयांची बचत करायची असेल तर त्याकरिता पीपीएफ, एनएससी म्हणजेच नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना, ईपीएफ योजना इत्यादीमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

यानुसार आपण वर बघितले की, जुन्या कर प्रणालीत पन्नास हजार रुपये पर्यंत स्टॅंडर्ड डिडक्शन उत्पन्नातून वजा केल्यानंतर 14.50 लाख रुपये कराच्या कक्षेत येतात व त्या 14 लाख 50 हजार रुपयेमधून या अंतर्गत मिळणारे दीड लाखांची कर बचत वजा केली तर 13.5 लाख कराच्या कक्षेत येतात.

एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम योजनेत गुंतवणूक केली तर मिळेल 50 हजार रुपयांची अतिरिक्त कर बचत
तसेच तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एनपीएस योजनेमध्ये वार्षिक 50 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक केली तर आयकर कायदा कलम 80 CCD(1बी) अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये 50 हजार रुपयांची अतिरिक्त कर बचत करता येते व हे पन्नास हजार रुपये तुम्ही कराच्या कक्षेत येत असलेल्या 13 लाख रुपयांमधून वजा केले तर 12.50 लाखाची कमाई कराच्या कक्षेत येते.

होमलोन असेल तर करता येते अतिरिक्त 2 लाख रुपयांची कर बचत
समजा तुम्ही जर होमलोन घेतले असेल तर त्या माध्यमातून आयकर कायदा कलम 24 बी अंतर्गत व्याजाच्या दोन लाख रुपयांच्या कर बचतीचा लाभ मिळवू शकतात व ते तुमच्या वार्षिक उत्पन्नातून वजा करू शकता.

जसे आपण एकूण कर बचतीतून कराच्या कक्षेत येणारे बारा लाख 50 हजार रुपये पाहिले व त्यातून जर हे दोन लाख रुपये वजा केले तर तुमचे एकूण कराच्या कक्ष दहा लाख पन्नास हजार रुपये येतात.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत 25 हजार रुपयांपर्यंत टॅक्स वाचवता येतो
जर तुम्ही मेडिकल पॉलिसी अर्थात हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर इन्कम टॅक्स कायद्याच्या 80 डी अंतर्गत 25 हजार रुपयापर्यंत कर वाचवू शकता. फक्त यामध्ये नियम असा आहे की,हेल्थ इन्शुरन्समध्ये तुमचे तसेच तुमच्या पत्नीचे व मुलांची नावे असावी.

तसेच तुमचे आई वडील जेष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या नावाने हेल्थ इन्शुरन्स घेऊन अतिरिक्त पन्नास हजार रुपयांपर्यंत वजावट मिळवू शकता. परंतु त्यांचे वय जर साठ वर्षापेक्षा कमी असेल तर मात्र 25 हजार रुपये पर्यंत क्लेम करता येणे शक्य आहे.

जर आपण यामध्ये फक्त 25 हजार रुपये विचारात घेतले तर हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून तुमच्या नावाने कर बचत केलेले 25000 व तुमच्या आई-वडिलांचा नावाने घेतलेल्या हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून करबचत केलेले पंचवीस हजार असे मिळून 50 हजार जर तुमच्या करकक्षेत येणाऱ्या दहा लाख पन्नास हजार रुपये मधून वजा केले

तर तुमचे एकूण दहा लाख रुपयांचे उत्पन्न कराच्या कक्षेत येते. जुन्या टॅक्स स्लॅब नुसार जर बघितले तर या सगळ्या कपातीनंतर तुम्हाला एक लाख 17 हजार रुपये इतका आयकर भरावा लागतो.

नव्या टॅक्स स्लॅबमध्ये पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर किती टॅक्स लागू होतो?
नव्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्ही पंधरा लाख रुपये उत्पन्न असेल तर केवळ 75 हजार रुपयांचा स्टॅंडर्ड डिडक्शनचा फायदा होतो. अशाप्रकारे 15 लाखातून जर 75 हजार रुपये स्टॅंडर्ड डिडक्शन वजा केले तर 14 लाख 25 हजार रुपये शिल्लक राहतात व नव्या कर सिस्टममध्ये तुम्हाला 14 लाख 25 हजार रुपये उत्पन्नावर एक लाख तीस हजार रुपये कर भरावा लागू शकतो व हे तुम्ही इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर करून पाहू शकतात.

वार्षिक पंधरा लाखांच्या उत्पन्नावर जुना टॅक्स स्लॅब आहे फायद्याचा
तुम्ही जर गुंतवणुकीच्या माध्यमातून कर कपातीचा फायदा घेतला तर जुनी टॅक्स प्रणाली खूप चांगली आहे. परंतु साडेचार लाख रुपयांची वजावट तुम्हाला क्लेम करणे यामध्ये गरजेचे आहे.

जी वजावट आपण वर तपशीलवार बघितली. तसेच तुम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केली नाही तरी जुन्या स्लॅबमध्ये तुम्हाला पंधरा लाखांच्या उत्पन्नावर दोन लाख 57 हजार 400 रुपयांचा आयकर लागू होतो.

अशा परिस्थितीमध्ये मात्र नवा टॅक्स स्लॅब हा पर्याय फायद्याचा ठरतो. कारण नव्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्ही कुठलीही गुंतवणूक न करता तुम्हाला फक्त एक लाख तीस हजार रुपये प्राप्तिकर भरावा लागतो.

म्हणजे जुन्या टॅक्स स्लॅबच्या तुलनेत तुम्ही कुठलीही गुंतवणूक न करता नव्या टॅक्स स्लॅबमध्ये एक लाख 27 हजार चारशे रुपये कराच्या रूपात वाचवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe