TCS Share Market: TCS चा शेअर पोहचला 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर! गुंतवणूकदारांचे दणाणले धाबे…

Published on -

TCS Share Market:- आज 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार असून आज सकाळपासून शेअर मार्केटची सुरुवात घसरणीने झाली आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सेन्सेक्समध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळाली होती. परंतु त्यानंतर मात्र घसरणीचा ट्रेंड हा कायम असून सध्याची जर आपण बीएसई सेन्सेक्सची स्थिती बघितली तर त्यामध्ये 374.79 अंकांची घसरण झालेली असून सध्या सेन्सेक्स 80808.77 वर पोहोचला आहे. त्यासोबतच निफ्टी 50 मध्ये देखील 135.5 अंकांची घसरण झाली असून या घसरणीसह 24634.10 वर पोहोचला आहे. तीच परिस्थिती निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप 100 सारख्या महत्त्वाच्या इंडेक्स मध्ये देखील दिसून येत आहे. या सगळ्या परिस्थितीचा विपरीत परिणाम मात्र गुंतवणूकदारांवर नक्कीच झाल्याची स्थिती असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आज तरी चिंतेचे वातावरण असण्याची शक्यता आहे. या सगळ्या घसरणीचा विपरीत परिणाम अनेक महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून आला व टीसीएस ही कंपनी देखील अपवाद ठरली नाही. या कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये आज 26.8 अंकांची घसरण दिसून आली आहे. विशेष म्हणजे ही घसरण या कंपनीच्या शेअरच्या 52 आठवड्याच्या निचांकी पातळीच्या जवळपास पोहोचण्याच्या स्थितीत आहे.

टीसीएसच्या शेअरची सध्याची किंमत काय?

काल 31 जुलै 2025 रोजी जेव्हा मार्केट बंद झाले तेव्हा टीसीएसच्या शेअरची बंद किंमत 3037 रुपये इतकी होती. आज 1 ऑगस्ट 2025 रोजी जेव्हा मार्केट ओपन झाले तेव्हा या शेअरची ओपन प्राईस 3030 रुपये इतकी होती व आता या शेअरच्या किंमतीमध्ये -0.88% ची घसरण झाली असून 3010 रुपयांवर सध्या ट्रेड करत आहे. तसेच या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत पातळी बघितली तर ती 4,592 रुपये इतकी होती तर नीचांकी पातळी 3006 सहा रुपये इतकी होती. म्हणजेच आजची असलेली या शेअरची किंमत जवळपास 52 आठवड्यातील निचांकी पातळीच्या जवळपास पोहचल्याचे दिसत आहे. सध्या टीसीएसचे मार्केट कॅप 1,089,044 कोटी रुपये इतके आहे.

टीसीएस शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा

गेल्या एक वर्षांमध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा बघितला तर तो निराशाजनक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. उपलब्ध आकडेवारीनुसार ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापेक्षा जास्त किंवा एक वर्ष यामध्ये गुंतवणूक केली त्यांना -31.36% परतावा मिळाला तर सहा महिने गुंतवणूक केली त्यांना -26.8%, तीन महिने केलेल्या गुंतवणुकीवर -12.84% आणि एक महिना गुंतवणुकीवर -13.05% परतावा दिलेला आहे.

जून 2025 मध्ये टीसीएसमध्ये असलेली शेअर होल्डिंग

जर आपण टीसीएस मधील शेअर होल्डिंग बघितली तर या कंपनीचे बहुतांशी शेअर्स प्रमोटर्सकडे असून त्याची टक्केवारी 71.77% इतकी आहे. तसेच वैयक्तिक गुंतवणूकदारांकडे 4.15% शेअर्स आहेत. तसेच म्युच्युअल फंड 5.13%, इन्शुरन्स कंपनीत 6.3%, फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार यांच्याकडे 11.48% आणि इतरांकडे 1.42 टक्के इतकी शेअर होल्डिंग आहे व ही आकडेवारी जून 2025 मधील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!