Tech Stock:- सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून त्या दृष्टिकोनातून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी देखील आपला गुंतवणुकीचा ट्रेंड बदलणे खूप गरजेचे आहे. सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर केला जातो तसेच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या क्षेत्रामध्ये खूप मोठी वाढ दिसून येत आहे. या मुद्द्याला धरून काही ब्रोकरेज कंपन्यांनी या डेटा सेंटर क्षेत्रातील काही निवडक शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवलेली असून जे गुंतवणुकीसाठी फायद्याचे ठरू शकते. चला तर मग ब्रोकरेज कंपन्यांनी निवडलेले शेअर कोणते? याबाबतची माहिती बघू.
तज्ञांनी निवडलेले शेअर्स
1- भारती एअरटेल- एअरटेल ही टेलिकॉम क्षेत्रातील एक मोठी आणि अग्रगण्य कंपनी असून ही कंपनी आपला डेटा सेंटर व्यवसाय नक्स्ट्रा अंतर्गत चालवते.नक्स्ट्राने संपूर्ण देशामध्ये एक मोठे डेटा सेंटर नेटवर्क तयार केलेले आहे. यामध्ये मोठ्या कंपन्या आणि क्लाऊड प्रोव्हायडर कडून मागणी वाढत असल्यामुळे नक्स्ट्राचा आणखी विस्तार होण्याची अपेक्षा असल्यामुळे तज्ञांनी खरेदीसाठी या शेअर्सची निवड केलेली आहे व याकरिता जिओजितने साधारणपणे 2123 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली असून जी 12 टक्के वाढ दाखवते.

2- अदानी एंटरप्राइझेस- हे कंपनी अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी असून अदानी कनक्स च्या माध्यमातून पूर्ण देशांमध्ये डेटा सेंटर नेटवर्क तयार करण्यासाठी एजकनक्स सोबत पार्टनरशिप केली असून ही कंपनीची एअरपोर्ट, ग्रीन हायड्रोजन आणि पायाभूत सुविधा सारख्या क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याची एक महत्त्वाची स्टेप आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर व्हेंचुराने या शेअर साठी 3801 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली असून जी 58% पर्यंत वाढ दाखवते.
3- नेटवेब टेक्नॉलॉजीज- ही एक परफॉर्मन्स कम्प्युटिंग सोल्युशन देणारी कंपनी असून तिचे सर्व्हर आणि सुपर कम्प्युटिंग उत्पादने डेटा सेंटर इकोसिस्टमशी कनेक्ट आहेत. या शेअरची किंमत गेल्या काही महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून व्हेंचुराने 2805 रुपयांची टार्गेट प्राईस दिलेली होती व त्या आधीच या शेअरने तीन हजार दोनशे रुपयांची पातळी ओलांडून खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे.