PPF Scheme : तुमचही लखपती होण्याचं स्वप्न आहे का? मग तुमचे हे स्वप्न पोस्ट ऑफिस पूर्ण करणार आहे. खरे तर पोस्टाकडून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या बचत योजना राबवल्या जात आहेत. आजच्या काळात गुंतवणूकीला विशेष महत्त्व आहे. आता गुंतवणुकी शिवाय पर्याय राहिलेला नाही. वाढती महागाई आणि वाढती जबाबदारी पाहता गुंतवणुकीला फार महत्त्व आले आहे. दरम्यान जर तुम्हालाही शेअर मार्केट व म्युच्युअल फंड सोडून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर आजचा लेख तुमच्याच कामाचा आहे. कारण आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे 12500 रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला तब्बल 40 लाख रुपयांचे रिटर्न मिळणार आहेत. मासिक हजारो रुपयांच्या गुंतवणुकीतून पोस्टाची ही योजना लखपती बनवणार आहे.
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ही योजना भारत सरकारची आहे. तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही पोस्टात जाऊन किंवा बँकेत जाऊन अकाउंट ओपन करू शकता. ही योजना पंधरा वर्षांची आहे. यामध्ये दरवर्षी कमीत कमी पाचशे रुपये गुंतवावे लागतात. तसेच जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यात गुंतवलेल्या पैशांवर सध्या 7.1% व्याज मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे यातून गुंतवणूकदारांना टॅक्स फ्री व्याज मिळते. यात केलेली गुंतवणूक, मिळणारे व्याज आणि गुंतवणुकीवर मिळणारी रक्कम सर्व काही टॅक्स फ्री आहे. पण या योजनेचा लॉक इन पिरेड हा पंधरा वर्षांचा आहे.

या योजनेचा पंधरा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला की गुंतवणूकदारांच्या इच्छेनुसार ही योजना आणखी पाच-पाच वर्षांनी एक्सटेंड करता येते. योजनेची विशेषता अशी की गुंतवणूक सुरू करून एका वर्षाचा काळ पूर्ण झाला की गुंतवणूकदारांना जमा रकमेवर कर्ज काढता येते. एवढेच नाही तर 5 वर्षांचा काळ पूर्ण झाला की आंशिक पैसे पण काढता येतात. थोडक्यात ही योजना लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याची ठरते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक सुरू केली म्हणजेच मासिक 12500 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर त्याला 15 वर्षांनी 40 लाख 68 हजार 209 रुपये मिळणार आहेत. यात त्याची गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये राहील. उर्वरित पैसे अर्थात 18 लाख 18 हजार 209 रुपये व्याजाचे राहतील.