Post Office : पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणूकदारांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते, पोस्टाकडे लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी योजना आहेत. आज आपण पोस्टाची अशी एक योजना जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला उत्तम कमाईची संधी देते. येथे तुम्हाला सार्वधिक व्याजाचा लाभ मिळतो, जो इतर कोणत्याही योजनेत मिळत नाही.
पोस्ट ऑफिसमध्ये अनेक लहान बचत योजना आहेत. ज्यामध्ये लोक डोळे झाकून गुंतवणूक करू शकतात. येथे तुम्ही अगदी थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता, आणि दुप्पट परतावा कमावू शकता.
खरं तर, आम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेबद्दल बोलत आहोत, ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट केले जातात. ही देशाची अल्पबचत योजना आहे. या योजनेत गुंतवणुकीवर 7.5 टक्के दराने वार्षिक व्याज दिले जात आहे.
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या सरकारी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एक व्यक्ती खाते उघडू शकतो. तुमची इच्छा असल्यास येथे तीन लोक मिळून संयुक्त खाते देखील उघडू शकतात. इतकेच नाही तर पालक देखील आपल्या मुलाच्या वतीने त्यांच्या स्वत:च्या नावावर KVP खाते उघडू शकतात.
तुम्ही KVP योजनेत किमान 1,000 रुपयांपसून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही 100 रुपयांच्या पटीतही गुंतवणूक करू शकता. यामध्ये कमाल मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात.
यात जमा केलेली रक्कम अर्थ मंत्रालयाने वेळोवेळी विहित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होते, जी जमा करण्याच्या तारखेला लागू होते. या योजनेत गुंतवणुकीची रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होते.
अधिकृत वेबसाइटनुसार, किसान विकास पत्र खाते काही विशिष्ट परिस्थितीत मॅच्युरिटीपूर्वी बंद केले जाऊ शकते. सिंगल खाते किंवा संयुक्त खाते कोणत्याही किंवा सर्व खातेधारकांच्या मृत्यूनंतर बंद केले जाऊ शकते.