पंजाब नॅशनल बँकेची एफडी योजना SBI पेक्षा फायदेशीर ठरणार ! PNB च्या ‘या’ योजनेत 12 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?

Ahmednagarlive24 office
Published:

Punjab National Bank FD Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी फार आधीपासून फिक्स डिपॉझिट ला प्राधान्य दाखवले जाते. फिक्स डिपॉझिट अर्थातच एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

पंजाब नॅशनल बँक ही एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कालावधीच्या FD योजना ऑफर करत आहे. पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 1204 दिवसांची FD योजना सुद्धा ऑफर करत आहे. यामुळे जर तुम्हालाही तीन-चार वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर पीएनबीची एफडी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान आज आपण पीएनबीच्या याच एफडी योजनेची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे पीएनबीची 1204 दिवसांची एफडी योजना

1204 दिवस अर्थातच 40 महिन्यांची म्हणजे 3.33 वर्षांची एफडी योजना. अनेक जण लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करतात. तीन ते चार वर्षांच्या कालावधीच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही पीएनबीच्या 1204 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक केली तर तुमच्यासाठी हा एक फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

पंजाब नॅशनल बँक या कालावधीच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांना 6.40% व्याजदराने परतावा देत आहे. तसेच याच कालावधीच्या एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 6.90% व्याजदर आणि परतावा दिला जातोय. म्हणजे सामान्य ग्राहकांच्या तुलनेत जेष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50 टक्के अधिकचा परतावा दिला जातोय.

याशिवाय सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना या कालावधीच्या एफडी योजनेत तब्बल 7.20% व्याज दराने परतावा दिला जातोय. अर्थातच सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी बँकेची ही एफडी योजना विशेष फायदेशीर ठरणार आहे.

12 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार

सामान्य नागरिकांनी जर 1204 दिवसांच्या निफ्टी योजनेत 12 लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना मॅच्युरिटीवर 14 लाख 79 हजार 586 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच व्याज म्हणून दोन लाख 79 हजार 586 रुपये मिळणार आहेत. जर समजा सुपर सिनियर सिटीजन ग्राहकाने या एफडी योजनेत बारा लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना मॅच्युरिटीवर 15 लाख 18 हजार 481 रुपये मिळणार आहे. म्हणजे या FD योजनेतून सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना तीन लाख 18 हजार 481 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe