Pension Schemes : सरकारच्या ‘या’ टॉप पेन्शन योजनांमधून मिळेल जबरदस्त उत्पन्न, बघा कोणत्या?

Published on -

Pension Schemes : निवृत्तीनंतर अनेकांना त्यांच्या खर्चाची चिंता सतावते, सेवानिवृत्तीनंतर जर आरामदायी जीवन जगायचे असेल तर त्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. भारतात अनेक पेन्शन योजना आहेत, अशातच सरकारकडून देखील अनेक निवृत्ती योजना राबवल्या जातात.

दरम्यान, आज आपण अशा चार सरकारी योजनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. या सरकारी योजनांमध्ये पेन्शनशिवाय इतर अनेक फायदेही मिळतात. यात आरोग्य सेवा, सेवानिवृत्ती लाभ आणि प्रवास सवलत देखील उपलब्ध आहे.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली

भारताच्या केंद्र सरकारने बचतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्ती नंतरचे तुमचे आयुष्य सुरक्षित करू शकता. यामध्ये, गुंतवलेल्या रकमेवर नियंत्रित बाजार आधारित आणि सुरक्षित परतावा मिळतो. ही योजना निवृत्तीनंतर वृद्धापकाळात तुमच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत बनू शकते. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.

एलआयसी पेन्शन योजना

वार्षिक हमी पेन्शन योजना एलआयसीद्वारे चालवली जाते. यामध्ये एकरकमी रक्कम भरल्यानंतर तुम्हाला हमी पेन्शन मिळते. यामध्ये गुंतवणूक सुरू केल्यानंतर 15 वर्षांनी रक्कम काढता येते. हमी परताव्यामध्ये काही फरक असल्यास भारत सरकार अनुदान देते.

अटल पेन्शन योजना

असंघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, गरीब आणि वंचितांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्हाला दरमहा पेन्शन मिळते. यामध्ये तुम्हाला दरमहा एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. 1 ऑक्टोबर 2022 नंतर करदात्याला या योजनेत सहभागी होता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही पात्र भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना सरकार चालवत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन मिळू शकते. या योजनेंतर्गत, दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना 60 ते 79 वर्षे वयोगटातील 300 रुपये दरमहा पेन्शन दिली जाते. यानंतर, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना 500 रुपये पेन्शन म्हणून दिले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe