SBI FD Scheme:- तुम्हाला मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि तुम्ही चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर तुमच्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन योजना अतिशय फायद्याच्या ठरतील. यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहतेच परंतु तुम्हाला हमी परतावा देखील मिळतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे वय आणि त्यांची गुंतवणूक करण्याची आर्थिक क्षमता याचा पुरेपूर अभ्यास करून वेगवेगळ्या प्रकारच्या तीन योजना सुरू केलेल्या आहेत. चला तर मग या तीन मुदत ठेव योजनांची थोडक्यात माहिती बघू.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन फायदेशीर एफडी योजना
1- अमृतवृष्टी एफडी योजना- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली अमृतवृष्टी एफडी योजना अतिशय फायदेशीर योजना असूनही 444 दिवसांच्या मर्यादित कालावधीची योजना आहे. या योजनेत 444 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांसाठी 6.60% इतका व्याजदर देण्यात येत आहे तर ज्येष्ठ नागरिकांकरिता 7.10% इतका व्याजदर देण्यात येत आहे.

2- ग्रीन रुपी ठेव योजना- ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाची अतिशय महत्त्वाची योजना असून मोठ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये किमान 1.01 कोटी रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे असते व गुंतवणुकीचा कालावधी हा 1111,1777 आणि 2222 दिवसांचा आहे व यावर 5.95% ते 6.45% इतका व्याजदर देण्यात येतो. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.70% इतका व्याजदर मिळतो.
3- पेट्रन्स डिपॉझिट( सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना)- स्टेट बँक ऑफ इंडियाची ही विशेष एफडी योजना असूनही सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ज्यांचे वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांसाठी राबवली जाते व विशेष म्हणजे या योजनेत कमीत कमी 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. या योजनेत गुंतवणुकीवर 7.15 टक्के पर्यंत व्याजदर मिळतो व 0.25 टक्क्यांचा अतिरिक्त नफा देखील यामध्ये समाविष्ट आहे.