FD Interest Rates : SBI पेक्षाही ‘या’ बँका FD वर देत आहेत सर्वाधिक व्याज, आजच गुंतवा पैसे

FD Interest Rates : आजही लोक मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवणूकवण्यास महत्व देतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पैशांची सुरक्षितता. एफडी मध्ये केलेली गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीपेक्षा कित्येक तरी पटीने सुरक्षित आहे. म्हणूनच आज एफडीकडे सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पहिले जाते. 

ज्यांना दीर्घ मुदतीसाठी उत्तम परताव्यासह पैशांची सुरक्षितता पाहिजे त्यांच्यासाठी एफडी हा एक चांगला मार्ग आहे. विशेष बाब म्हणजे लहान फायनान्स बँका मोठ्या बँकांच्या तुलनेत एफडीवर अधिक व्याज देतात. आज आपण स्मॉल फायनान्स बँका एफडीवर किती व्याज देतात हे पाहणार आहोत.

-स्मॉल फायनान्स बँकेत मुदत ठेव ठेवल्यास 8 टक्के वार्षिक व्याज सहज मिळू शकते. मोठ्या सरकारी आणि खाजगी बँका एफडीवरील व्याजाच्या बाबतीत लहान वित्त बँकांच्या पुढे नाहीत. मात्र, या बँकांची जोखीम पातळी इतर सरकारी आणि खासगी बँकांच्या तुलनेत थोडी जास्त आहे.

-युनिटी स्मॉल फायनान्स बँक सध्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे. जर तुम्ही युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत 1001 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 9 टक्के दराने व्याज मिळेल.

-सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक दोन वर्षे आणि दोन दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.65 टक्के व्याज देत आहे. त्याचप्रमाणे, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 15 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर ग्राहकांना 8.5 टक्के व्याज देत आहे.

-जनता स्मॉल फायनान्स बँकेत मुदत ठेव करूनही तुम्ही चांगले परतावे मिळवू शकता. बँक 365 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.5 टक्के वार्षिक दराने व्याज देत आहे. त्याचप्रमाणे, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक देखील 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.5 टक्के व्याज देत आहे.

-उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक दोन वर्षे ते तीन वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.5 टक्के वार्षिक व्याज देत आहे. ESAF स्मॉल फायनान्स बँक देखील व्याज देण्याच्या बाबतीत मागे नाही आणि बँक दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8.25 टक्के व्याज देत आहे.

-AU स्मॉल फायनान्स बँक 18 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर ग्राहकांना 8 टक्के व्याज देत आहे. हे व्याज स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेने त्याच कालावधीसाठी देऊ केलेल्या व्याजापेक्षा खूप जास्त आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe