Fixed Deposit : एफडी करण्यासाठी ‘या’ बँका आहेत उत्तम पर्याय, देत आहेत भरघोस परतावा

Content Team
Published:
Fixed Deposit

Fixed Deposit : सेवानिवृत्तीनंतर, ज्येष्ठ नागरिक त्यांच्या बचत आणि नियमित उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी अनेकदा मुदत ठेवींकडे (FD) वळतात. सध्या मुदत ठेवीवर मोठ्या प्रमाणात व्याज दिले जात आहेत, आज आपण अशाच बँकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत. येथे आपण 3 वर्षाच्या कालावधीसाठी वेगवगेळ्या बँकांचे व्याजदर जाणून घेणार आहोत.

SBM बँक

SBM बँक इंडिया ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 वर्षांच्या FD वर 8.10 टक्के व्याजदर देत आहे. म्हणजे 3 वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1,27,198 रुपये वाढतील.

DCB बँक

DCB बँक 3 वर्षाच्या FD वर 8.05 टक्के व्याजदर देत आहे. म्हणजे 3 वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1,27,011 पर्यंत वाढतील.

आरबीएल बँक, येस बँक

आरबीएल बँक आणि येस बँक 3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्के व्याजदर देत आहेत. या कालावधीत 3 वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1,26,824 रुपयांपर्यंत वाढतील.

बंधन बँक, IDFC फर्स्ट बँक, इंडसइंड बँक

बंधन बँक, IDFC फर्स्ट बँक आणि इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याजदर देत आहेत. म्हणजे 3 वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1,25,895 रुपये वाढतील.

ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक

Axis Bank आणि Kotak Mahindra Bank 3 वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर देत आहेत. दरम्यान, 3 वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1,25,340 रुपयांपर्यंत वाढतील.

फेडरल बँक, HDFC बँक, ICICI बँक

फेडरल बँक, HDFC बँक आणि ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देत आहेत. म्हणजे 3 वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1,24,972 रुपये वाढतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe