Small Business Idea : व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहात ? मग ‘हा’ व्यवसाय सुरु करा, लाखोत कमाई होणार

Published on -

Small Business Idea : तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरे तर अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. नोकरीमध्ये शाश्वती नसल्याने आता नोकरीं नको रे बाबा असा ओरड तरुणांच्या माध्यमातून केला जात आहे.

मात्र व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना अनेकदा कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाही. यामुळे आज आपण अशा एका भन्नाट बिजनेस आयडियाबाबत जाणून घेणार आहोत जो व्यवसाय सुरू करून तरुणांना चांगली कमाई करता येणार आहे. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी अधिक भांडवलाची गरज लागणार नाही. थोडे पैसे गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येतो आणि व्यवसाय सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच यातून कमाई सुरू होणार आहे.

कोणता आहे तो व्यवसाय

आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे कटलरी मॅन्युफॅक्चरिंगचा बिजनेस. प्रत्येक घरात कटलरी प्रॉडक्टची आवश्यकता असते. किचनमध्ये कटलरींच्या वस्तू आवश्यक असतात. यामुळे या व्यवसायातुन बारा महिने कमाई करता येणे शक्य आहे. या व्यवसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या मुद्रा योजनेचीही मदत मिळू शकणार आहे.

प्रत्येक घरात कटलरी सामानांची आवश्यकता असल्याने हा व्यवसाय कधीच मंदीत राहू शकत नाही. यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या व्यवसायाची चांगली ब्रॅण्डिंग करावी लागणार आहे एवढे नक्की. आता आपण या व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागू शकते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

किती गुंतवणूक करावी लागणार

मेटल कटलरी मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला थोडी गुंतवणूक मात्र लागणार आहे. कटलरी मॅन्युफॅक्चरिंग बिजनेससाठी तीन ते चार लाख रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. याच्या सेटअपसाठी तुम्हाला सुमारे 1.8 लाख रुपये खर्च करावे लागतील. यासाठी तुम्हाला वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्राइंडर, हँड ड्रिलिंग, हँड ग्राइंडर, बेंच, पॅनेल बोर्ड आणि इतर साधनांची आवश्यकता लागणार आहे.

याशिवाय तुम्हाला कच्च्या मालावर सुमारे 1.2 लाख रुपये खर्च करावे लागतील. अहवालानुसार, या कच्च्या मालाच्या सहाय्याने दर महिन्याला 40,000 कटलरी, 20,000 हाताची साधने आणि 20,000 कृषी अवजारे तयार करता येऊ शकतात.

कटलरी व्यवसायातुन किती कमाई होणार

एवढा खर्च करून तयार होणारे उत्पादन 1.10 लाख रुपयांना विकले जाणार आहे. तर त्याच्या निर्मितीसाठी दरमहा सुमारे 91800 रुपये खर्च येईल. जर तुम्ही एवढे कटलरी सामान एका महिन्यात विक्री केले तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपयांपेक्षा जास्त नफा होणार आहे.

जर तुम्ही या व्यवसायासाठी कर्ज घेऊ इच्छित असाल तर कर्जाची परतफेड केल्यानंतर आणि प्रोत्साहन खर्च वजा केल्यावर, तुमचा निव्वळ नफा 14,400 रुपयांपेक्षा जास्त असेल. जर तुम्ही कटलरी सामानांचे उत्पादन वाढवले तर या व्यवसायातून मिळणारां तुमचा नफा देखील वाढणार आहे. यासाठी मात्र तुम्हाला तुमचे सेलिंग देखील वाढवावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe