गुड न्युज ! ‘या’ बँकेने वाढवलेत FD चे व्याजदर, आता गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणार 8% व्याज

FD Interest Rate : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील पब्लिक सेक्टर मधील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी एफडी करणाऱ्यांना चांगले व्याजदर दिले आहे. यामुळे गुंतवणूकदार आता बँकेत एफडी करण्याला विशेष पसंती दाखवत आहेत. पब्लिक सेक्टर मधील अनेक बँकानी गेल्या काही महिन्यांच्या काळात एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. या नवीन वर्षात देखील देशातील काही बड्या बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहे. अशातच आता युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

बँकेने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अर्थातच 19 जानेवारी 2024 ला दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बँकेच्या माध्यमातून सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीची एफडी ऑफर केली जात आहे. या वेगवेगळ्या कालावधीमधील एफ डी साठी वेगवेगळे व्याजदर बँकेच्या माध्यमातून दिले जात आहे. विशेष बाब अशी की ज्येष्ठ नागरिकांना युनियन बँकेच्या माध्यमातून अधिकचे व्याजदर पुरवले जात आहे.

युनियन बँक सुपर सीनियर सिटीजन गुंतवणूकदारांना एफडीसाठी आठ टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहे. यामुळे युनियन बँक ऑफ इंडिया या पब्लिक सेक्टर मधील बँकेत FD स्वरूपात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे. आता आपण युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर ऑफर केले जात आहे याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, युनियन बँक सात दिवसांपासून ते 45 दिवसांच्या कालावधीच्या एफडी साठी सर्वसामान्यांना 3.50% आणि जेष्ठ नागरिकांना 4% व्याज देत आहे. 46 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी एफडी करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना साडेचार टक्के आणि ज्येष्ठ गुंतवणूकदारांना पाच टक्के व्याज दिले जात आहे. 91 दिवस ते 120 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांना 4.80 आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.30% व्याज दिले जात आहे.

121 दिवसांपासून ते 180 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांना 4.90% आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.40% व्याज दिले जात आहे. 181 दिवसांपासून ते एक वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडी साठी सर्वसामान्यांना 5.75% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.25% व्याज ऑफर केले जात आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी आणि एक वर्ष ते 398 दिवसाच्या गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याज दिले जात आहे.

तसेच 399 दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज मिळत आहे. तसेच चारशे दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 6.50 आणि ज्येष्ठ नागरिकांना सात टक्के व्याज ऑफर केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe