राज्यातील ‘या’ बड्या बँकेने गृह कर्जावरील व्याजदरात केली मोठी कपात, प्रक्रिया शुल्क देखील केले माफ, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Home Loan Interest Rate

Home Loan Interest Rate : अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या असल्याने सर्वसामान्यांना घर घेण्याचा विचार करणे म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे असेचं वाटत आहे.

यामुळे अनेक जण आता होम लोन अर्थातच गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. स्वप्नातील घरांसाठी गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान गृह कर्ज घेणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे महाराष्ट्रातील एका बड्या बँकेने गृहकर्तावरील व्याजदरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने गृह कर्जावरील व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. BOM ने गृहकर्जाचे व्याजदर ८.५० टक्क्यांवरून 8.35 टक्क्यांवर आणले आहे.

अर्थातच व्याजदर 0.15 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय बँकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. खरंतर बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेचे लाखो खातेधारक आहेत.

बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. बँकेकडून गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज इत्यादी प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. दरम्यान बँकेने होम लोन वरील कर्जात कपात करण्याचे जाहीर केले आहे.

सोबतच बँकेच्या माध्यमातून गृह कर्जासाठी आवश्यक असलेले प्रक्रिया शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना अगदी स्वस्त दरात गृह कर्ज उपलब्ध होणार आहे. निश्चितच नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच बँकेच्या माध्यमातून घेण्यात आलेला

हा निर्णय ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असून ही बाब बँकेच्या ग्राहकांसाठी खूपच आनंदाची राहणार आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्राचा देखील सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. BOM ने गृह कर्जाच्या व्याजदरात केलेली ही कपात ताबडतोब अमलात आणली गेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe