‘या’ कंपनीला मिळाले 100 कोटींचं काम! आज शेअरने घेतली उडी… गुंतवणूकदार आनंदात

Published on -

Protean eGov Technologies Share:- आज शेअर बाजारात एक सकारात्मक घडामोड पाहायला मिळाली व ती म्हणजे प्रोटियन ईगव्ह टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. कारणही तसंच ठोस होतं. कंपनीला तब्बल १०० कोटी रुपयांचे नवीन काम मिळाल्याची घोषणा सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर करण्यात आली. याचा परिणाम आज सकाळपासूनच दिसू लागला.

प्रोटियन ईगव्ह टेक्नॉलॉजीजने बीमा सुगम इंडिया फेडरेशनकडून (BSIF) मिळालेल्या या वर्क ऑर्डरची माहिती कालच उघड केली होती. हे काम ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ म्हणजेच आरएफपी प्रक्रियेअंतर्गत मिळाले असून त्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे. ही बातमी बाजारात पोहोचताच गुंतवणूकदारांनी उत्साहाने कंपनीच्या शेअर्सकडे वळत खरेदी सुरू केली.

आज या शेअरची स्थिती कशी होती?

आज सकाळी बीएसईवर कंपनीचा शेअर ९९०.०५ रुपये दराने उघडला आणि लवकरच त्याने उडी घेत १००९ रुपयांवर पोहोचला. म्हणजेच सुमारे ६ टक्क्यांनी वाढ झाली. काही वेळानंतर या भरघोस वाढीचा वेग थोडासा कमी झाला असला तरी कंपनीचे शेअर्स दिवसाच्या सुरुवातीला लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले.

या कंपनीची कामगिरी कशी आहे?

मात्र, संपूर्ण चित्र पाहिल्यास कंपनीचा प्रवास फारसा चांगला नाही. गेल्या एका आठवड्यात शेअरमध्ये सुमारे ३.६२ टक्क्यांची वाढ झाली असली तरी मागील एका महिन्याचा विचार केल्यास या शेअरने जवळपास २२ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. या वर्षात तर कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ४९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या संपूर्ण वर्षाच्या परफॉर्मन्सकडे पाहिल्यासही हा शेअर १२ टक्क्यांनी खाली आला आहे.

या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे आकडेही लक्षात घ्यायला हवेत. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक म्हणजे सर्वात जास्त किंमत २२२५ रुपये होती, तर नीचांक ९४४ रुपये इतका खाली गेला होता. आजचा भाव बघता, कंपनी सध्या त्या नीचांकाच्या जवळपासच व्यवहार करत आहे. सध्या कंपनीचा मार्केट कॅप ३,९९३ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

एक गोष्ट मात्र उल्लेखनीय आहे व ती म्हणजे गेल्या वर्षी कंपनीने पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला होता. सप्टेंबर महिन्यात एक्स-डिव्हिडंड ट्रेड झाल्यानंतर कंपनीने प्रति शेअर १० रुपये लाभांश दिला. हे पाहता कंपनीकडून काही चांगले पावले उचलली जात आहेत, पण त्याचा शेअरच्या दीर्घकालीन प्रवासावर फारसा सकारात्मक परिणाम झालेला नाही.

अशाप्रकारे आपण बघितले की प्रोटियन ईगव्ह टेक्नॉलॉजीजला मिळालेल्या नव्या कामामुळे तात्पुरती चाल मिळाली असली, तरी शेअरच्या दीर्घकालीन प्रवासावर विश्वासाने गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी अजून थोडा संयम बाळगलेलाच बरा. कंपनीने भविष्यकाळात स्थिरता आणि वाढ दाखवली, तरच हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचारात घेता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe