अवघ्या 5 वर्षात ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये झाली 652% वाढ! गुंतवणूकदारांना बनवलं करोडपती

Published on -

Raminfra Shares:- शेअर बाजारात आज एका छोट्या पण महत्त्वाच्या कंपनीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रामइन्फो लिमिटेड नावाच्या या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी सलग दुसऱ्या दिवशी उड्डाण घेतलं आणि गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. दोन दिवसांतच शेअर जवळपास ४०% वाढला आहे आणि यामागचं कारणही तितकंच प्रभावी आहे. तब्बल ४७४ कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर कंपनीला मिळाली आहे.

या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर

रामिन्फो लिमिटेडच्या नेतृत्वाखालील एका कन्सोर्टियमला राजस्थान रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मोठा प्रकल्प मिळाला आहे. या प्रकल्पांतर्गत, राज्य सरकारच्या इमारतींमध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचं काम दिलं गेलं आहे. या सोलर प्रकल्पाची एकूण क्षमता ७३ मेगावॅट आहे, आणि या कामामध्ये डिझाइनपासून टेस्टिंग, इन्स्टॉलेशन, ऑपरेशन आणि देखभाल हे सर्व काही समाविष्ट आहे. तेही तब्बल २५ वर्षांसाठी. सरकारी पातळीवर मिळालेला असा दीर्घकालीन करार ही गुंतवणूकदारांसाठी एक मोठी आश्वासक बाब ठरते.

हे यश कंपनीसाठी नवं नाही. मागील काही वर्षांमध्ये रामिन्फो लिमिटेडने भक्कम प्रगती दाखवली आहे. पाच वर्षांपूर्वी केवळ १४.७८ रुपयांवर असलेला हा शेअर आज १११.१९ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच ६५२ टक्क्यांची झपाट्याने झालेली वाढ. इतकी जोरदार कामगिरी एखाद्या छोट्या कंपन्याला गुंतवणूकदारांच्या नजरेत आणण्यास पुरेशी असते.

शेअर बाजारात या कंपनीच्या गतीचा अंदाज लावणं थोडं कठीण असलं, तरी मागील काही महिन्यांमधील आकडे काही संकेत देतात. गेल्या एका महिन्यातच शेअरमध्ये ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र त्याचवेळी, मागील एक वर्ष पाहता कंपनीच्या शेअरमध्ये १७ टक्क्यांची घटही झाली होती. त्यामुळे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करताना जोखीम समजून घेणं गरजेचं आहे.

कंपनीची अलीकडील घोषणा काय?

कंपनीने नुकतंच आपल्या ऊर्जा क्षेत्रातील विस्ताराची घोषणा केली होती. ५ मे २०२५ रोजी ‘रामिन्फो ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ ही नवीन उपकंपनी स्थापन करून कंपनीने स्पष्ट इशारा दिला की आता त्यांच्या योजनांचा केंद्रबिंदू ग्रीन एनर्जी असणार आहे. त्यामुळे पुढील काही तिमाहींमध्ये कंपनीच्या कामगिरीकडे गुंतवणूकदार आणि विश्लेषक दोघेही लक्ष ठेवून असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!