पोस्ट ऑफीसची ‘ही’ भन्नाट योजना; व्याजावर कराची सूट तर मिळतेच परंतु खातेही सहज ट्रान्सफरही होते

Published on -

सगळ्यात सोयीस्कर व विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून पोस्ट ऑफीसच्या विविध गुंतवणुकांकडे पाहिले जाते. सरकारी बँकांएवढेच व्याजदर पोस्टाच्या विविध स्किममध्ये मिळत असल्याने अनेकजण सध्या पोस्टात गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. तुम्ही सुरक्षित मुदत ठेव शोधत असाल आणि तुम्हाला बंपर व्याज हवे असेल, तर पोस्ट ऑफिस योजना ही एक सुवर्णसंधी आहे. पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी पुरेशी आहे, जी मजबूत व्याज देण्यासाठी पुरेशी आहे.

पोस्ट ऑफीसची टीडी योजना

तुम्ही दोन वर्षांसाठी टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 3 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला 44,664 रुपये व्याज मिळेल. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटवर लोकांना भरघोस व्याज मिळत आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एका वर्षासाठी टाईम डिपॉझिट गुंतवली तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळेल. जर तुम्ही त्यात 2 वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर व्याजदर 7.0 टक्के व्याज मिळेल. याच हिशोबाने 3 वर्षांसाठी 7.1 टक्के व 5 वर्षांसाठी 7.5 टक्के व्याज मिळते.

काय आहे फायदा?

पोस्ट ऑफीसची सगळ्यात चांगली व सगळ्यात लोकप्रिय टीडी योजना आहे दोन वर्षांची. दोन वर्षांनी तुम्हाला 3,44,664 रुपये व्याज मिळते. ही व्याजाची रक्कम तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी पुरेशी आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना ही सरकारी बचत योजना मानली जाते. ज्यामुळे ती खूप सुरक्षित आहे. यामध्ये सर्व ग्राहकांना समान व्याज मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर समान आहे. तुम्ही या योजनेत किमान 200 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

ट्रान्सफरचा आहे फायदा

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टाईम डिपॉझिट अकाउंट एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे ट्रान्सफर करता येते. कलम 80 सी अंतर्गत 5 वर्षांच्या टीडीवर कर सूट मिळते. पोस्ट ऑफीस कार्यालये ही भारतभर असल्याने तुम्ही कोणत्याही शहरात किंवा राज्यात गेलात तरी, तुम्हाला तुमचं खातं त्या शहरात ट्रान्सफर करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News