LIC policy : LIC ही आपल्या देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC कडे विविध वर्ग आणि वयोगटातील लोकांसाठी एलआयसीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आज आपण LIC च्या अशाच एका प्लानबद्दल जाणून घेणार आहोत. LICची ही योजना खास मुलींसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेतून मुली उत्तम परतावा कमवू शकता.
एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला 151 रुपये गुंतवावे लागतील आणि विमा कालावधी पूर्ण केल्यावर तुम्हाला 31 लाख रुपयांचा लाभ मिळेल. होय, या योजनेत तुम्हाला कमी गुंतवणुकीत दीर्घकालावधीसाठी चांगले फायदे मिळतात.

LIC ची ही योजना खास मुलींसाठी तयार करण्यात आली असून, त्याचे फायदेही खूप आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलींच्या अभ्यासाच्या किंवा लग्नाच्या चिंतेपासून सहज मुक्त होऊ शकता. तुमच्या माहितीसाठी, या योजनेचे नाव आहे कन्यादान पॉलिसी असे आहे. यामध्ये तुम्हाला दररोज फक्त 151 रुपये गुंतवणूक तुम्ही भविष्यासाठी चांगली बचत करू शकता.
ही योजना घेण्यासाठी मुलीचे वय 13 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे. वास्तविक, एलआयसीची ही कन्यादान पॉलिसी २५ वर्षांसाठी आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रीमियम म्हणून फक्त 22 रुपये भरावे लागतील आणि पुढील 3 वर्षांसाठी तुम्हाला कोणतेही प्रीमियम भरावे लागणार नाही. तुम्ही ही पॉलिसी 17 वर्षांपर्यंत देखील घेऊ शकता.
या कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज 151 रुपये गुंतवल्यास, दरमहा तुम्ही 4530 रुपये गुंतवता. यामध्ये तुम्हाला 22 वर्षे सतत प्रीमियम भरावा लागेल. 25 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला 31 लाख रुपये दिले जातात.
जर तुम्हाला एलआयसी कन्यादान पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन विकास अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या भागातील एलआयसी एजंटशीही संपर्क साधू शकता.
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
-मुलीचा जन्म दाखला.
-पालकांचे आधार कार्ड.
-पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो.













