SBI FD Scheme : SBI बँकेची ‘ही’ योजना तुम्हाला 400 दिवसांत बनवेल श्रीमंत, बघा व्याजदर…

Ahmednagarlive24 office
Published:
SBI FD Scheme

SBI FD Scheme : जर तुम्ही सध्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एसबीआयची अमृत कलश एफडी योजना उत्तम पर्याय राहील, बँक सध्या या 400 दिवसांच्या एफडीवर खूप चांगला परतावा देत आहे, येथे गुंतवणूक करून तुम्ही 400 दिवसांत श्रीमंत होऊ शकता.

SBI ‘अमृत कलश’ योजना ही 400 दिवसांची FD आहे जी 7.6 टक्के दराने व्याज देते. या SBI योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांकडे आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वेळ आहे. या नंतर बँक ही योजना बंद करेल, अस्थितीत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

SBI च्या म्हणण्यानुसार, बँकेच्या अमृत कलश स्पेशल FD स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याज मिळत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज देत आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे. बँकेने ही मुदत ६ महिन्यांसाठी वाढवली आहे. या कालावधीत कोणीही ही योजना ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुक करू शकते. अमृत ​​कलश याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना बँक कर्ज सुविधा देखील प्रदान करते. तुम्ही अमृत कलश योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.

400 दिवसात बनवेल श्रीमंत

बँकेच्या वेबसाइटनुसार, कोणीही अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह गुंतवणूक करू शकतो आणि हमी परतावा मिळवू शकतो. SBI बँकेच्या मते, अमृत कलश एफडी गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याज पेमेंट घेऊ शकतात. SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर, TDS कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकाच्या खात्यात जोडले जातात. SBI वेबसाइटनुसार, अमृत कलश FD मध्ये जमा केलेले पैसे 400 दिवसांपूर्वी काढले गेल्यास, बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा 0.50 टक्के ते 1 टक्के कमी व्याजदर वजा करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe