Stock Split: ‘ही’ स्मॉल कॅप कंपनी करणार स्टॉक स्प्लिट! 1 शेअरचे होणार 10 शेअर्समध्ये विभाजन…गुंतवणूकदारांना होणार का फायदा?

Published on -

Stock Split:- आपल्याला माहित आहे की अनेक कंपन्यांच्या माध्यमातून शेअर होल्डर्स करिता डिव्हिडंड म्हणजेच अंतिम लाभांशाची घोषणा केली जाते व या माध्यमातून गुंतवणूकदारांना आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होत असतो. याच पद्धतीने आपण ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक स्मॉल कॅप कंपनी बघितली तर या कंपनीच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट म्हणजेच शेअरचे विभाजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे ही कंपनी पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट करत आहे. चला तर मग या लेखात आपण या संबंधीचेच माहिती बघू.

रोलेक्स रिंग्ज करणार स्टॉक स्प्लिट

ऑटो कंपोनंट क्षेत्रामधील महत्त्वाची असलेली स्मॉल कॅप कंपनी रोलेक्स रिंग्ज आपल्या शेअरचे विभाजन म्हणजे स्टॉक स्प्लिट करणार असल्याची माहिती समोर आली असून यासंबंधीची सूचना 4 सप्टेंबरला कंपनीच्या माध्यमातून शेअर बाजारांना देण्यात आली व यामध्ये त्यांनी सांगितले की कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून हे स्प्लिट 1:10 प्रमाणामध्ये केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे या कंपनीच्या एका शेअरचे विभाजन 10 शेअर्समध्ये केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीच्या माध्यमातून स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु ही तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच कंपनीने म्हटले आहे की यासंबंधीचा निर्णय हा भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबून असून जर हे स्टॉक स्प्लिट करण्यात आले तर कंपनीचे हे पहिले स्टॉक स्प्लिट असणार आहे. अजून पर्यंत कंपनीच्या माध्यमातून मात्र गुंतवणूकदारांकरिता बोनस शेअर्स जारी करण्यात आलेले नाहीत.

रोलेक्स रिंग्ज कंपनीच्या शेअरचा परफॉर्मन्स

सध्या जर आपण या कंपनीच्या शेअरची कामगिरी बघितली तर शुक्रवारी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी यामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले व हा शेअर 1394.50 रुपयांवर पोहोचला. एनएसई वर मात्र यामध्ये 0.66% ची घसरण पाहायला मिळाली. या वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 25% ची घसरण झाली असून गेल्या एका वर्षात त्यांच्या शेअरच्या किमती 44% कमी झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe