यंदा देशातील सर्वच बँका गृह कर्जाच्या व्याज दरात मोठी कपात करणार ! Home Loan च्या व्याजदरात किती टक्के कपात होणार ?

Home Loan Interest Rate

Home Loan Interest Rate : गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या किमतीमध्ये होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बाप बनली आहे. वाढती महागाई, बिल्डिंग मटेरियल चे वाढलेले दर,

वाढती मजुरी या सर्व पार्श्वभूमीवर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळे घरांचे स्वप्न पूर्ण करणारे सर्वसामान्य लोक आता घर खरेदीसाठी गृहकर्जाचा उपयोग करत आहे. कर्ज घेऊन घर निर्मितीचे आपले स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे अशा 2024 हे गृह कर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी दिलासादायी ठरणार आहे. कारण की, या चालू वर्षात गृहकर्ताच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. खरेतर गेल्या दोन वर्षात गृहकर्ताच्या व्याज दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत गृह कर्जाचे EMI मध्ये साधारणपणे 20% पेक्षा जास्तीची वाढ नमूद करण्यात आली आहे. मात्र, यंदा या कर्जाच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे.

यामुळे वाढलेल्या ईएमआयमधून अनेकांना यंदा दिलासा मिळण्याची आशा आहे. 2024 मध्ये गृहकर्जाच्या व्याजदरात 0.5% ते 1.25% कपात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, गृहकर्जाच्या व्याजदरात घट झाली तर या कपातीचा फायदा कसा घ्यायचा, हा एक मोठा प्रश्न आहे.

साधारणपणे, आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतरही बँका गृह किंवा इतर कर्जावरील व्याजदरात लगेच कपात करत नाहीत. जर समजा बँकांनी व्याज दरात कपात केली तर याचा लाभ कर्जदारांना लगेचच मिळत नाही. यामुळे आता आपण गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतर लगेचच याचा लाभ कसा मिळवता येऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.

बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गृहकर्ज घेणार्‍याने EBLR (एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट) मध्ये गृहकर्ज घेतलेले असेल तर व्याजदरात कपात झाली की लगेचच याचा लाभ संबंधित कर्जदाराला घेता येतो. ईबीएलआर प्रणाली अंतर्गत, रेपो दर कमी झाल्यानंतर गृहकर्जाच्या व्याजदरात कपात सुरू होते.

EBLR अंतर्गत, व्याज दरातील कपात ही रेपो दरातील कपातीच्या समतुल्य असते. यामुळे जर तुम्हाला गृहकर्जाच्या व्याजदरात झालेल्या कपातीचा फायदा लगेचच घ्यायचा असेल तर तुमचे गृह कर्ज EBLR अंतर्गत येते की नाही हे आधी चेक करावे लागणार आहे.

ते जर हे कर्ज ईबीएलआर अंतर्गत येत नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन हे कर्ज सर्वप्रथम ई बी एल आर अंतर्गत करावे लागणार आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला बँकेकडे काही शुल्क जमा करावे लागणार आहे. मात्र शुल्क भरल्यानंतर तुमचे गृह कर्ज ई बी एल आर मध्ये कन्व्हर्ट केले जाईल. असे केल्यास व्याज दरात कपात झाली तर लगेचच तुम्हाला याचा फायदा मिळू शकणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe