Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरता कायम आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धामुळे (War) मौल्यवान धातूंमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. यादरम्यान सोन्याचे (Gold) दर आणि चांदीच्या (Silver) दरात वाढ झाली आहे.
आज भारतातील 22 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत (INR) ग्रॅम 22 कॅरेट सोने आज प्रति 1 ग्रॅम ₹4,841 आहे, तर कालचा दर हा ₹4,840 होता. तसेच ₹8 ग्रॅम ₹38,728 रुपये दर होता, तर काल ₹38,720 दर होता. व 10 gram सोन्याचा आजचा दर ₹48,410 आहे, तर कालचा दर ₹48,400 रुपये होता.

गुंतवणूकदार (Investors) आणि औद्योगिक मागणी कमजोर राहिली. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने नवीन खरेदीदारही दूर राहिले.
24 कॅरेट सोने शुद्ध
साधारणपणे २४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध मानले जाते, परंतु या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत कारण ते खूप मऊ असते. म्हणून, दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोने वापरले जाते.
कोणते सोने शुद्ध आहे
२४ कॅरेट सोने ९९.९ टक्के आहे.
23 कॅरेट सोने 95.8 टक्के आहे.
22 कॅरेट सोने 91.6 टक्के आहे.
21 कॅरेट सोने 87.5 टक्के आहे.
18 कॅरेट सोने 75 टक्के आहे .
17 कॅरेट सोने 70.8 टक्के आहे.
14 कॅरेट सोने 58.5 टक्के आहे.
9 कॅरेट सोने 37.5 टक्के आहे.
खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
ग्राहक सोने खूप काळजीपूर्वक खरेदी करा. या काळात सोन्याच्या गुणवत्तेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राहकाचे हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच सोने खरेदी करा.कॅरेटचा वेगळा हॉलमार्क क्रमांक असतो. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी असते आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.