10 वर्षात लाखो रुपये कमवून देणारे टॉप 7 Mutual फंड्स! गुंतवणूकदारांना दिला 12 टक्के पेक्षा जास्त परतावा

आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे एक चांगल्या दरात नफा मिळवण्याची संधी आहे.पण त्याबरोबरच ते खूप जोखिमीचे असू शकते. ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात घसरण होत असताना म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीसाठी अधिक सुरक्षित आणि लाभदायक पर्याय ठरले आहेत.

Ratnakar Ashok Patil
Updated:

Top Mutual Fund:- आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे एक चांगल्या दरात नफा मिळवण्याची संधी आहे.पण त्याबरोबरच ते खूप जोखिमीचे असू शकते. ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात घसरण होत असताना म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीसाठी अधिक सुरक्षित आणि लाभदायक पर्याय ठरले आहेत.

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि यावरून हे स्पष्ट होते की या पर्यायावर लोकांचा विश्वास निर्माण झाला आहे.

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना, आपण टॉप फंड्सचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ७ सर्वोत्तम म्युच्युअल फंडांची यादी दिली आहे.ज्यांनी गेल्या १० वर्षांत चांगला परतावा दिला आहे. या फंड्समध्ये इक्विटी आधारित लार्ज-कॅप फंडांचा समावेश आहे, जे अधिक सुरक्षित आणि स्थिर असतात.

7 टॉप म्युच्युअल फंड

ICICI Prudential Bluechip Fund

ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंडाने गेल्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना १२.५३% सरासरी परतावा दिला आहे. या फंडाची AUM (असेट अंडर मॅनेजमेंट) ६१७१४.९९ कोटी रुपये आहे.

Nippon India Large Cap Fund

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडाने त्याच्या गुंतवणूकदारांना १२.४६% परतावा दिला आहे. या फंडाची AUM ३४५१७.६३ कोटी रुपये आहे.

Canara Robeco Bluechip Equity Fund

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंडाने १० वर्षांत १२.०७% परतावा दिला आहे. याच्या AUM मध्ये १४,१९६.७८ कोटी रुपयांचे भांडवल आहे.

SBI Bluechip Fund

एसबीआय ब्लूचिप फंडाने ११.६२% परतावा दिला आहे. याची AUM ४८०६२.०६ कोटी रुपये आहे.

Edelweiss Large Cap Fund

एडलवाईस लार्ज कॅप फंडाने ११.४०% परतावा दिला आहे. या फंडाची AUM १०७८.११ कोटी रुपये आहे.

Kotak Bluechip Fund

कोटक ब्लूचिप फंडाने ११.२४% परतावा दिला आहे. याची AUM ९,०२५.४७ कोटी रुपये आहे.

HDFC Large Cap Fund

HDFC लार्ज कॅप फंडाने ११.१०% परतावा दिला आहे. याची AUM ४,८४७.८२ कोटी रुपये आहे.

म्युच्युअल फंडाचा सुरक्षित पर्याय

इक्विटी फंडांची सर्वात सुरक्षित श्रेणी म्हणजे लार्ज-कॅप फंड. हे फंड सुरक्षेची अधिक हमी देतात आणि जास्त चढ-उतार न करता स्थिर परतावा देण्याची क्षमता असतात. लार्ज कॅप फंडांचा परतावा इतर कॅप फंडांच्या तुलनेत कमी असला तरी तो अधिक स्थिर आणि सुरक्षित असतो.

जर तुम्हाला जोखमीचा कमी टक्का हवा असेल तर लार्ज कॅप फंड तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. याव्यतिरिक्त, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंडांसोबत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे देखील फायदेशीर ठरू शकते. पण त्यात जोखीम जास्त असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe