Top Mutual Fund : भारतात गुंतवणुकीसाठी पारंपारिक पर्यायांचा सर्वाधिक विचार केला जातो. अनेक जण सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करतात तर काही लोक पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या एफडी योजनांमध्ये पैसे लावतात. पैसे गुंतवण्याचा विषय निघाला की आपोआप बँकांच्या एफडी योजना किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आपल्या डोळ्यासमोर येतात.
मात्र या वर्षात बँकांच्या FD योजनांचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे आणि यामुळे गुंतवणुकीचा ट्रेंड सुद्धा थोडासा बदलला आहे. आता बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवताना दिसत आहेत.

दरम्यान जर तुम्हाला ही म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहील. आज आपण असे टॉप पाच म्युच्युअल फंडबाबत माहिती पाहणार आहोत ज्यांनी दहा वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलंय.
हे आहेत सर्वाधिक रिटर्न देणारे म्युच्युअल फंड
एफडी मध्ये पैसा दुप्पट करायचा असेल तर गुंतवणूकदारांना साधारणतः 9-10 वर्षे वाट पाहावी लागते. पण आज आपण ज्या म्युच्युअल फंडची माहिती पाहणार आहोत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या तीन वर्षांच्या काळात दुप्पट केले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे या मिड कॅप फंडांनी गत दहा वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलंय. इक्विटी म्युच्यूअल फंड मध्ये गुंतवणूक करणारे बहुतेक गुंतवणूकदार लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करतात कारण की येथे रिस्क कमी असते.
पण लार्ज कॅप फंडा पेक्षा मिडकॅप फंड गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न देतात. तसेच मिडकॅप फंडातील रिस्क ही स्मॉल कॅप फंडा पेक्षा थोडी कमी असते. दरम्यान आता आपण टॉप पाच मिडकॅप फंड पाहणार आहोत ज्यांनी गेल्या तीन वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंड – या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तीन वर्षात वार्षिक 25.54% दराने रिटर्न मिळाले आहेत. अर्थात या फंडात तीन वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे मूल्य आता एक लाख 97 हजार 958 झाले असेल. या फंडात एसआयपी करणाऱ्यांना 24.92% दराने रिटर्न मिळाले आहेत.
एडलवाईज मिड कॅप फंड
3 वर्षांचा परतावा (CAGR) – 25.54%
तीन वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य – एक लाख 97 हजार 958
SIP वर 3 वर्षांचा परतावा – 24.92%
एचडीएफसी मिड कॅप फंड
3 वर्षांचा परतावा (CAGR) – 26.35%
तीन वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य – दोन लाख 1 हजार 854 रुपये
SIP वर 3 वर्षांचा परतावा – 23.91%
मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड
3 वर्षांचा परतावा (CAGR) – 29.12%
तीन वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य – दोन लाख 15 हजार 408 रुपये
SIP वर 3 वर्षांचा परतावा – 27.7%
इनवेस्को इंडिया मिड कॅप फंड
3 वर्षांचा परतावा (CAGR) – 29.31%
तीन वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य – दोन लाख 16 हजार 348 रुपये
SIP वर 3 वर्षांचा परतावा – 31.38%