Top Shares:- शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. परंतु शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही जोखमीची असल्याने परिपूर्ण अभ्यास करून आणि गुंतवणूक तज्ञांच्या योग्य असल्याने योग्य शेअरची निवड अतिशय महत्त्वाची ठरते. नाहीतर फायदा तर दूरच परंतु मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. सध्या जर आपण शेअर बाजाराची स्थिती बघितली तर यामध्ये बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटीमध्ये जो काही बदल करण्यात आला आहे त्याचे देखील स कारात्मक परिणाम हा बाजारावर दिसून येत आहे. या सकारात्मक वातावरणामध्ये मोतीलाल ओसवाल या प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने अंतर्गत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही शेअरची निवड केलेली आहे. या शेअर्समध्ये एका वर्षात 26% पर्यंत वाढ होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते.
मोतीलाल ओसवाल यांनी निवड केलेले शेअर
1- अल्ट्राटेक सिमेंट- आपल्याला माहित आहे की सिमेंट उत्पादक कंपनीमध्ये अल्ट्राटेक फार मोठे नाव आहे. या कंपनीसाठी मोतीलाल ओसवाल यांनी बाय रेटिंग दिले असून 14,600 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.

2- अंबर इंटरप्राईजेस- अंबर एंटरप्राईजेस एक अतिशय महत्त्वाची कंपनी असून एअर कंडिशनर आणि इतर उपकरणांसाठी कंपोनंट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या स्टॉकसाठी बाय रेटिंग देण्यात आली असून 9000 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
3- आयसीआयसीआय बँक- आयसीसी खासगी क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक आहे व या बँकेसाठी मोतीलाल ओसवाल यांनी बाय रेटिंग दिली असून 1670 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आलेले आहे.
4- विशाल मेगा मार्ट- विशाल मेगा मार्ट हे एक रिटेल क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. या मार्फत विविध प्रकारचे उत्पादन हे कमी किमतीमध्ये विक्री केले जातात. सध्या विशाल मेगा मार्टला बाय रेटिंग देण्यात आले असून याकरिता 170 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आलेली आहे.