Transformers And Rectifiers Share Price:- मल्टीबॅगर स्टॉक ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अभूतपूर्व परतावा दिला आहे. 7 फेब्रुवारी रोजी या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 30 रुपयांची वाढ होऊन 884 रुपयांवर बंद झाले.
या वाढीमुळे कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या शेअर्सने तब्बल 9577 टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे अवघ्या एका वर्षातच शेअरच्या किंमतीत 165 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कसा आहे या शेअरचा परफॉर्मन्स?
ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया ही कंपनी जड विद्युत उपकरणे उत्पादन क्षेत्रात काम करते. 6 फेब्रुवारी 2020 रोजी या शेअर्सची किंमत केवळ 8.82 रुपये होती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी 25000 हजार रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत ते शेअर्स विकले नसते तर त्याची गुंतवणूक 24 लाख रुपयांपर्यंत वाढली असती.
त्याचप्रमाणे 50000 रुपयांची गुंतवणूक 48 लाख रुपये, 1 लाख रुपयांची गुंतवणूक 97 लाख रुपये आणि 1.25 लाख रुपयांची गुंतवणूक तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक झाली असती.
मागील तीन वर्षाचा परतावा
बीएसईच्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांत या शेअर्सने 1873.53 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे 3 वर्षांपूर्वी गुंतवलेले 50000 रुपये 10 लाख रुपये झाले असते.
तर 1 लाख रुपयांची गुंतवणूक जवळपास 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचली असती. तसेच गेल्या दोन वर्षांतही या शेअर्सने 1181 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मात्र 2025 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा शेअर सुमारे 28 टक्क्यांनी घसरला आहे.
डिसेंबर 2024 च्या तिमाहीतील आर्थिक कामगिरी पाहता ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडियाने मोठ्या प्रमाणावर नफा कमावला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 253 टक्क्यांनी वाढून 55.88 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत हा नफा केवळ 15.72 कोटी रुपये होता. याच कालावधीत कंपनीच्या ऑपरेशन्समधून मिळणारा महसूलही 51 टक्क्यांनी वाढून 559.36 कोटी रुपये झाला आहे. जो डिसेंबर 2023 मध्ये 369.35 कोटी रुपये होता. एकूण खर्चही वाढून 484.59 कोटी रुपयांवर गेला आहे. जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 350.44 कोटी रुपये होता.
या दमदार वाढीमुळे ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेला शेअर असून भविष्यातही तो मजबूत कामगिरी करू शकतो. तथापि सध्याच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी भविष्यातील निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवेत.