Upcoming Big IPO: दिवाळीत पैसे तयार ठेवा! बाजारात येणार 3 मोठे IPO… बघा यादी

Published on -

Upcoming Big IPO:- तुम्ही देखील शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल व त्यातल्या त्यात तुमचा कल जर आयपीओत गुंतवणूक करण्याचा असेल तर तुमच्याकरिता सध्या एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण काही स्टार्टअप कंपन्या दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात आयपीओ आणण्यासाठी तयारी करत आहेत. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाचा एक रिपोर्ट जर बघितला तर त्यानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये बाजारात पाच मोठे आयपीओ येऊ शकतात व त्यातील काही महत्त्वाच्या आयपीओची माहिती आपण या ठिकाणी बघू.

दिवाळीच्या मुहूर्तावर येऊ शकणारे IPO

1- ग्रो- आपल्याला माहित आहे की ग्रो ही एक प्रसिद्ध फिनटेक कंपनी असून या कंपनीने त्यांचा बहुप्रतिक्षित आणि बहु चर्चेत असलेल्या आयपीओ करिता अद्ययावत कागदपत्रे सादर केली असून या आयपीओ अंतर्गत 1060 कोटी रुपयांची नवीन शेअर्सची विक्री केली जाणार आहे. तसेच सध्या जे काही भागधारक आहेत त्यांच्याकडून 5742 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सध्या ही भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकर कंपनी असून ही कंपनी त्यांचा आयपीओ दिवाळीच्या आसपास आणण्याची शक्यता आहे.

2- फिजिक्सवाला- फिजिक्स वाला हा एडटेक फर्म असून त्यांनी देखील तीन हजार 820 कोटी रुपयांच्या आयपीओ करिता अद्ययावत कागदपत्रे सादर केले आहेत. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते या कंपनीचा आयपीओ दिवाळीमध्ये येण्याची शक्यता असून तशी कंपनीची प्लॅनिंग सुरू आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार याचा अंतिम वेळ हा कंपनीच्या तिमाही कामगिरीवर आणि मूल्यांकनावर अवलंबून असणार आहे.

3- फोन पे- मिळालेल्या माहितीनुसार फोन पे देखील पुढील आठवड्यापासून IPO साठीची अद्ययावत कागदपत्रे दाखल करण्याची तयारी करत असून वॉलमार्ट समर्थित ही पेमेंट फर्म 88 हजार कोटी म्हणजेच एक अब्ज डॉलरची लिस्टिंग करण्याचा विचार करत आहे. फोन पे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये आपला आयपीओ बाजारात आणू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe