चालून आली आयपीओत गुंतवणूक करून लाखो रुपये कमवण्याची संधी! गुंतवणूकदारांना लागेल लॉटरी

जानेवारी महिना हा स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असा ठरणार आहे. कारण या जानेवारी महिन्यामध्ये पाच कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीकरिता खुले होणारा आहेत व त्यामुळे नक्कीच गुंतवणूकदार या माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात व तशी संधी या माध्यमातून निर्माण झाली आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:
upcoming ipo

Upcoming IPO:- जानेवारी महिना हा स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असा ठरणार आहे. कारण या जानेवारी महिन्यामध्ये पाच कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीकरिता खुले होणारा आहेत व त्यामुळे नक्कीच गुंतवणूकदार या माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात व तशी संधी या माध्यमातून निर्माण झाली आहे.

कारण बरेच गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात व अशा गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची संधीच हा महिना घेऊन आला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या अनुषंगाने या आठवड्यात कुठल्या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत? यांची तपशीलवार माहिती आपण या लेखात बघू.

या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी होणार खुले

1- रेक्सप्रो एंटरप्राइजेस- रेक्सप्रो इंटरप्राईजेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ 22 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीकरिता खुला होणार आहे व 24 जानेवारीपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

कंपनीने या आयपीओकरिता 145 रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे व एका लॉटमध्ये 100 शेअर्स मिळणार आहेत. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना किमान एक लाख 45 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

2- सीएलएन एनर्जी- या कंपनीचा आयपीओ 23 जानेवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे व 27 जानेवारीपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीने या आयपीओकरिता 235 ते 250 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे व त्यानुसार रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये 600 शेअर्स मिळणार असून त्याकरिता 1.50 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत.

3- जीबी लॉजिस्टिक्स- जीबी लॉजिस्टिक लिमिटेड कंपनी एसएमई आयपीओ असून 24 जानेवारी रोजी गुंतवणुकीकरिता खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना याकरिता 28 जानेवारीपर्यंत बोली लावता येणार आहे.

कंपनीच्या माध्यमातून मात्र या आयपीओचा प्राईस बँड निश्चित करण्यात आलेला नाही. परंतु या माध्यमातून जीबी लॉजिस्टिक्स ही कंपनी 24.58 लाख शेअर्स जारी करणार आहे.

4- कॅपिटल नंबर्स इन्फोटेक लिमिटेड- या ipo च्या माध्यमातून कॅपिटल नंबर इन्फोटेक लिमिटेड कंपनी 32.20 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे व या ऑफर फॉल सेल अंतर्गत हे शेअर्स जारी केले जाणार आहेत.

कॅपिटल नंबर इन्फोटेक लिमिटेड कंपनीच्या आयपीओ करिता 20 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येणार असून कंपनीने यासाठीचा प्राईस बँड 250 ते 263 रुपये निश्चित केला आहे. विशेष म्हणजे या कंपनीचा आयपीओ शेअर ग्रे मार्केटमध्ये 110 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

5- डेंटा वाटर- डेंटा वाटर लिमिटेड कंपनी हा मेनबोर्ड आयपीओ 22 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार असून कंपनीने या आयपीओ शेअर करिता 279 ते 290 रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे.

रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये 50 शेअर्स मिळतील व त्याकरिता किमान 14700 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ शेअर सध्या ग्रे मार्केटमध्ये 110 रुपयांवर ट्रेड करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe