Upcoming IPO 2025:- गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजारामध्ये तेजीचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे व यामध्ये गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याच्या संधी चालून येत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण या कालावधीतच वेगवेगळ्या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होत असून या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे परतावा मिळवण्याची संधी चालून आली आहे.
16 जानेवारी 2025 रोजी स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 199.45 कोटी रुपयांचा निधी उभारणार असून या आयपीओत 20 जानेवारीपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.
किती आहे स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स आयपीओची शेअर प्राईस बँड?
मिळालेल्या माहितीनुसार, स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी आयपीओ लॉन्च करणार असून या माध्यमातून 160.73 कोटी रुपयांचे जवळपास 1.79 कोटी नवीन शेअर्स जारी करणार
असून ही कंपनी प्रवर्तक शहजाद शेरियार रुस्तमजी ओएएफएसद्वारे 43.02 लाख शेअर्स विकणार आहेत. ही कंपनी आयपीओ शेअरकरिता 85 ते 90 रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे.
लिस्ट करा या आयपीओबाबत महत्त्वाच्या तारखा
स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी आयपीओ शेअरचा अलॉटमेन्ट 21 जानेवारी 2025 रोजी करण्यात येणार आहे व बीएसई व एनएसईवर 23 जानेवारीला लिस्ट करण्यात येणार आहेत. या कंपनीच्या आयपीओकरिता बुक रनिंग लीड मॅनेजर सारथी कॅपिटल ॲडव्हायझर्स कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.
या निधी उभारण्यातून कंपनीचा काय आहे प्लॅनिंग?
या आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी जो काही निधी उभा करणार त्यातून 95 कोटी रुपये वाढीव खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी खर्च करणार आहे व 50.3 कोटी रुपयांचा निधी सेमीकंडक्टर आणि स्पेशालिटी गॅस डिबल्किंग
आणि ब्लेंडिंग फॅसिलिटी आणि रेफ्रिजरेंट डिबल्किंग आणि ब्लेंडिंग फॅसिलिटीसाठी आवश्यक भांडवली खर्चाच्या गरजांसाठी हा निधी वापरणार आहे. तसेच जो निधी उरेल तो सामान्य कार्पोरेट कारणांसाठी खर्च करण्यात येणार आहे.
ही कंपनी काय काम करते?
स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल लिमिटेड कंपनीची स्थापना 2002 मध्ये करण्यात आलेली आहे व ही कंपनी रेफ्रिजरेटर व त्यासोबतच औद्योगिक वायू आणि संबंधित उत्पादनांची विक्री करते.