Upcoming IPO:- भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. 3 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात एकूण 5 नवीन IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. त्याचबरोबर दोन कंपन्यांचे आयपीओ (डॉ. अग्रवाल्स हेल्थकेअर आणि मालपानी पाईप्स) शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत.
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बाजाराचा कल कोणत्या दिशेने राहतो यावर या आयपीओंना मिळणारा प्रतिसाद ठरणार आहे. जानेवारी महिन्यात एकूण 27 आयपीओंनी तब्बल 7,354 कोटी रुपये उभारले होते. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसाठीही हा महत्त्वाचा काळ आहे.
लॉन्च होणारे आयपीओ
चामुंडा इलेक्ट्रिकल्स
हा IPO (4 ते 6 फेब्रुवारी) चामुंडा इलेक्ट्रिकल्स कंपनीचा SME आयपीओ असून 4 फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे. कंपनी 14.60 कोटी रुपयांची भांडवल उभारणी करणार आहे.
प्राईस बँड 47-50 रुपये ठरवण्यात आला असून प्रत्येक लॉटमध्ये 3,000 शेअर्स असतील. गुंतवणूकदारांना किमान 1.41 लाख रुपये गुंतवावे लागतील. हा आयपीओ 6 फेब्रुवारीला बंद होईल.
केन इंटरप्रायझेस IPO (5 ते 7 फेब्रुवारी)
केन इंटरप्रायझेसचा IPO 5 फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. या आयपीओद्वारे कंपनी 83.65 कोटी रुपये उभारणार आहे. प्रत्येक लॉटमध्ये 1,200 शेअर्स असतील आणि प्राईस बँड 94 रुपये ठेवण्यात आला आहे. गुंतवणूकदार 7 फेब्रुवारीपर्यंत या IPO मध्ये बोली लावू शकतात.
अमविल हेल्थकेअर IPO (5 ते 7 फेब्रुवारी)
अमविल हेल्थकेअर कंपनीचा IPO देखील 5 फेब्रुवारीला सुरू होणार असून 7 फेब्रुवारीला बंद होईल. कंपनी या IPO च्या माध्यमातून 60 कोटी रुपये उभारणार आहे. यातून 44.03 लाख नवे शेअर्स जारी केले जातील आणि 10 लाख शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील.
रेडीमिक्स कन्स्ट्रक्शन मशिनरी IPO
या IPO च्या माध्यमातून कंपनी 37.66 कोटी रुपये उभारणार आहे. एकूण 30.62 लाख शेअर्स जारी केले जाणार असून प्राईस बँड 121-123 रुपये ठेवण्यात आला आहे. हा IPO 6 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध असेल.
एलेगंझ इंटेरिअर्स IPO
या कंपनीचा IPO 7 फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि 11 फेब्रुवारी रोजी बंद होईल. कंपनी 78.07 कोटी रुपये उभारणार असून 60.05 लाख शेअर्स जारी केले जातील. या IPO साठी प्राईस बँड 123-130 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
या आठवड्यात दोन मोठ्या कंपन्यांचे लिस्टिंग
याशिवाय डॉ. अग्रवाल्स हेल्थकेअर (मेनबोर्ड IPO) आणि मालपानी पाईप्स (SME IPO) 4 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारात नवीन संधी निर्माण होणार आहे.
गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या कंपन्यांचे आर्थिक प्रदर्शन, बाजारातील मागणी आणि भविष्यातील वाढीच्या संधी यांचा विचार करून योग्य निर्णय घ्या. बाजारातील स्थिती लक्षात घेऊन IPO मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवण्याची संधी आहे.