Upcoming IPO:- गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात मोठी जर गुंतवणुकीची संधी असेल तर ती आयपीओमध्ये असते व बरेच गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. जर आपण 8 सप्टेंबर 2025 पासून सुरु होणाऱ्या नवीन आठवड्यात बघितले तर अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. साधारणपणे प्राप्त माहितीनुसार या येणाऱ्या आठवड्यात तीन कंपन्यांचे आयपीओ येणार असून या कंपन्या या माध्यमातून 2700 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा निधी उभारणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तुम्हाला देखील जर आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी येणार आठवडा खूप फायद्याचा ठरणार आहे. चला तर मग या लेखात आपण थोडक्यात येणाऱ्या आयपीओ बद्दलची माहिती बघू.
आठ आठवड्यात येणारे आयपीओ
1- अर्बन कंपनी- ही भारतातील सर्वात मोठी होम सर्विस मार्केटप्लेस कंपनी म्हणून ओळखली जाते. हा 1900 कोटींचा आयपीओ 10 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 12 सप्टेंबर पर्यंत ओपन राहणार आहे. याकरिता कंपनीने प्रतिशेअर किंमत लॉट हा 98 ते 103 रुपये निश्चित केलेला आहे. यात 472 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 1428 कोटी रुपयांचे विद्यमान शेअर विकले जाणार आहेत.

2- डेव एक्सेलरेटर आणि श्रीनगर हाऊस ऑफ मंगलसूत्रा- या दोन्ही कंपन्यांचे आयपीओ देखील दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान खुले राहणार असून यातील डेव एक्सेलरेटर फ्लेक्सिबल वर्क स्पेस पुरवणारी कंपनी असून या माध्यमातून 143 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने यासाठी प्रतिशेअर 56 ते 61 रुपये निश्चित केलेला आहे. तसेच दुसरी महत्त्वाची कंपनी म्हणजे श्रीनगर हाऊस ऑफ मंगलसूत्रा मुंबई येथील एक प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड असून हा ब्रँड या आयपीओच्या माध्यमातून 401 कोटी रुपये उभारणार आहे. याकरिता कंपनीने 155 ते 165 रुपये प्रति शेअर किंमत पट्टा निश्चित केलेला आहे.
3- एसएमई क्षेत्रातील आयपीओ- याव्यतिरिक्त जय अंबे सुपर मार्केट, नीलाचल कार्बो मेटालिक्स, कार्बो स्टील इंजीनियरिंग, कृपालू मेटल्स आणि एअर फ्लोरेल टेक यासारख्या अनेक एसएमई कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.