UPI Lite : अलीकडच्या काळात देशात UPI Lite चा वापर वाढला आहे. अशातच आता जर तुम्हीही UPI Lite वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून UPI Lite द्वारे ऑफलाइन व्यवहारांची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
त्याबाबत आरबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्या भागात इंटरनेट नाही किंवा सिग्नल खूपच कमकुवत असेल त्यांच्यासाठी UPI लाइटद्वारे ऑफलाइन मोडमध्ये व्यवहारांची मर्यादा 200 रुपयांवरून 500 रुपये केली आहे. जाणून घ्या सविस्तर.
होईल 2000 रुपयांपर्यंत व्यवहार
कोणत्याही पेमेंट प्लॅटफॉर्मवर UPI-Lite द्वारे आता केवळ 2,000 रुपयांचे व्यवहार केले जातील असे RBI ने असे सांगितले आहे.
ऑफलाइनद्वारे पेमेंटची रक्कम वाढली आहे.
आरबीआयकडून ऑफलाइन माध्यमातून छोट्या रकमेच्या डिजिटल पेमेंटची मर्यादा वाढवण्यासाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ऑफलाइन पेमेंट व्यवहाराची कमीत कमी मर्यादा 500 रुपये इतकी केली आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये सुरु झाली सुविधा
इंटरनेट सुविधेपासून वंचित असणाऱ्या स्मार्टधारकांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये ऑफलाइन पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली होती. त्यासाठी नवीन युनिफाइड पेमेंट प्लॅटफॉर्म UPI-Lite सादर केले आहेत. परंतु त्यात फक्त 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत.
लोकप्रिय पद्धत
काही वेळातच ही पेमेंट पद्धत प्लॅटफॉर्म मूळ स्मार्टधारकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. सध्या या माध्यमातून महिन्याभरात एक कोटीपेक्षा जास्त व्यवहार होऊ लागले आहेत. UPI-Lite चा वापर वाढवण्यासाठी, RBI ने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला NFC तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑफलाइन व्यवहार सुलभ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. NFC द्वारे व्यवहार करण्यात येतात त्यावेळी पिन पडताळणीची गरज नसते.
जाणून घ्या खासियत
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे UPI Lite सह व्यवहार करत असताना फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे.
- काही मर्यादेपर्यंतच व्यवहार करता येणार आहेत.
- UPI Lite कमी किमतीत UPI व्यवहार करणे खूप सोपे करते.
- इतकेच नाही तर तुम्हाला कोणत्याही शुल्काशिवाय UPI शिल्लक परत त्याच बँक खात्यामध्ये कधीही ट्रान्सफर करता येतात.