फोन पे, गुगल पे सारख्या UPI एप्लीकेशन्स वापरणाऱ्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आता पेमेंट करण्यासाठी चेहरा दाखवावा लागणार

Published on -

UPI Payment : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये फोन पे, google पे, पेटीएम अशा पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून यूपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे देशात कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली असून सरकार सुद्धा कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. दरम्यान, जर तुम्हीही यूपीआयने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

आता यूपीआय पेमेंट मधील फसवणुकीला आळा घालण्यासाठी एनपीसीआयकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. खरे तर आता यूपीआयने पेमेंट करण्यासाठी पिन सोबतच बोटांचे ठसे तसेच चेहरा दाखवता येणार आहे.

यूपीआय पेमेंट करतांना ट्रांजेक्शन पिन टाकावा लागतो. पण आता ट्रांजेक्शन पिन सोबतच ओळख पडताळणीसाठी चेहरा आणि बोटांचे ठसे यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी चेहरा दाखवून किंवा बोटाचे ठसे लावून पेमेंट करता येणार आहे.

यामुळे फसवणुकीला आळा बसणार असल्याचा विश्वास देखील एनपीसीआयकडून व्यक्त करण्यात आला आहे. खरे तर यूपीआयच्या नियमांमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बदल झाले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एमपीसीआयच्या माध्यमातून सातत्याने नियमांमध्ये सुधारणा केली जात आहे.

ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता जपणे हाच या सुधारणांचा उद्देश आहे. आता यूपीआय पेमेंट करतांना होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी तसेच आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी Face Scan आणि फिंगरप्रिंटला सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत यूपीआय पेमेंटसाठी फक्त संख्यात्मक पिनचा पर्याय उपलब्ध होता.

पण आता ‘आरबीआय’च्या नव्या नियमांनुसार इतर ओळख पद्धतींनाही परवानगी मिळाली आहे. यूपीआय व्यवहारात गेल्या एका वर्षात 31 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे यूपीआय पेमेंट वाढत आहे तर दुसरीकडे अशा पेमेंटमध्ये ग्राहकांची आर्थिक फसवणूक सुद्धा होत आहे.

ऑनलाइन पेमेंटमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. आता याच फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिक डेटाद्वारे डिजिटल व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता ग्राहक अंगठ्याचा ठसा, चेहरा ही ओळख वापरून पेमेंट करण्यास समर्थ असतील.

विशेष म्हणजे आपल्या देशातच ही सुविधा सुरू होणार आहे असे नाही, तर दुसऱ्या देशात आधीपासूनच ही सुविधा अस्तित्वात आहे. ज्या देशांत ही सुविधा सुरू झालीये तिथे फसवणुकीचे प्रमाण देखील 50 टक्क्यांनी कमी झाले आहे.

यामुळे आपल्याकडेही आर्थिक फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे ही नवीन सुविधा कालपासून अर्थात आठ ऑक्टोबर 2025 पासून ग्राहकांसाठी सुरू झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News