UPI Transactions : भारीचं की ! ‘ही’ बँक UPI व्यवहारावर देतेय 7,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक, बघा…

Content Team
Published:
UPI Transactions

UPI Transactions : जर तुम्हीही UPI द्वारे सतत व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. होय, अलीकडेच एक खाजगी बँकेने UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी एक बंपर कॅशबॅक ऑफर आणली आहे. बँक ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी कॅशबॅक जिंकण्याची संधी देत आहे. कोणती आहे ही बँक आणि किती कॅशबॅक देत आहे चला पाहूया…

खाजगी क्षेत्रातील DCB बँकेने Happy Savings Account सुरू केले आहे. या बचत खात्याची खास गोष्ट म्हणजे या खात्यातून UPI ​​व्यवहार करून तुम्ही दरमहा ६२५ रुपये जिंकू शकता.

DCB बँकेच्या मते, हॅप्पी सेव्हिंग अकाऊंटमधून UPI ​​द्वारे डेबिट व्यवहारांवर वर्षभरात 7,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जातो. यासाठी किमान 500 रुपयांचा UPI व्यवहार करावा लागेल. हा कॅशबॅक बँक केवळ डेबिट व्यवहारांवरच दिला जाईल.

हा कॅशबॅक तिमाहीत केलेल्या व्यवहारांच्या आधारावर दिला जाईल आणि तिमाही संपल्यानंतर खात्यात जमा केला जाईल. हॅपी सेव्हिंग खातेधारकांना एका महिन्यात जास्तीत जास्त 625 रुपये आणि वर्षभरात जास्तीत जास्त 7,500 रुपये कॅशबॅक मिळेल.

UPI व्यवहार वाढवण्यासाठी चालना !

देशातील UPI व्यवहार दर महिन्याला नवनवे विक्रम निर्माण करत आहेत. लोकांना रोख व्यवहारांऐवजी ऑनलाइन UPI ​​द्वारे व्यवहार करणे अधिक योग्य आणि सोपे वाटत आहे. NPCI च्या मते, डिसेंबर महिन्यात UPI द्वारे व्यवहार 17.4 ट्रिलियन रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की आर्थिक वर्ष 2027 पर्यंत, UPI व्यवहारांची संख्या दररोज 100 कोटींचा आकडा पार करेल. असा अंदाज आहे की पाच वर्षांत दुकानातील 90 टक्के व्यवहार UPI द्वारे होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe